लोणी दि.२४ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-ग्रामीण भागाचा विद्यार्थी हा तंञशिक्षणातून पुढे जाण्यासाठी प्रवरा शैक्षणिक संकुल हे कायम आपल्या सोबत आहे.विद्यार्थी,शिक्षक आणि पालक यांच्या प्रयत्नातूनच आपण यश संपादन करणार आहोत विद्यार्थीना दर्जेदार शिक्षणासाठी प्रवरा परिवार कायम आपल्या सोबत आहे असे प्रतिपादन सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जी.बी. शिदे यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे चिंचोली-सिन्नर येथील सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्य अभिमुखता कार्यक्रमात डाॅ.शिदे बोलत होते. यावेळी प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख प्रा. के.पी. तांबे, माजी विद्यार्थी जितेंद्र वाघ, स्नेहा मांडे, अमित कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डाॅ.शिदे म्हणाले, प्रथम वर्षात दाखल झालेल्या विद्यार्थ्यासाठी आयोजित अभिमुखता कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थी व पालक यांना केंद्रस्थानी ठेवून विविध अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्व स्वरूप तसेच महाविद्यालयाचे नीती नियम विशद करण्यात केले. प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख के. पी. तांबे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी सामाजिक तसेच जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे विशेष कार्य संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सतत होत आली आहे. या अनुषंगाने विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन व इतर उपक्रम राबवण्यात येतात त्याचबरोबर दर्जेदार शिक्षणासोबत भरती मेळावा व प्लेसमेंट मार्गदर्शनामुळे ग्रामीण विद्यार्थी रोजगारक्षम होत आहे.यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुश्मिता विखे पाटील यांचे मार्गदर्शन होत असते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कारले यांनीकरतांना महाविद्यालयांचे विविध उपक्रम आणि सेवा-सुविधा बाबत माहीती दिली सुञसंचालन गौरी देशमुख यांनी तर आभार प्रा.ऋषिकेश भालेराव यांनी मानले.