21.4 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

ना. एकनाथ शिंदे हे शिवरायांप्रमाणेच जनतेच्या समस्या, व्यथांची जाण असणारे, गरजूंना आधार देणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले.-शिवसेना संपर्कप्रमुख प्रशांत काळे

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-  ८० % समाजकारण करताना, समाजातील वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणारा शिवसैनिक बाळासाहेबांना अपेक्षित होता. असा शिवसैनिक घडविण्याचे काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे . शिवसेनेचे कार्य मुंबईसह संपूर्ण राज्यात जोमाने सुरू आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व पक्षबांधणी साठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना जबाबदारी टाकून सन्मान मिळवून दिला जात आहे. असे मनोगत शिवसेना पक्ष निरीक्षक प्रशांत काळे यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे हे युती शासन आहे. या शासनामुळे प्रलंबित निळवंडे चा शेती पाणी प्रश्न सोडविला गेला . त्याचप्रमाणे घाट माथ्यावरचे अतिरिक्त पाणी वळवून ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गोदावरी, प्रवरा, व मुळा नदीपात्रात आणून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्याचं काम हेच शासन करील. असा विश्वास खा सदाशिवराव लोखंडे यांनी व्यक्त केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात मा. खा. श्री. सदाशिव लोखंडे व पक्ष निरीक्षक मा श्री. प्रशांत काळे यांचे अध्यक्षतेखाली दौरे सुरू असून आज शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे कोपरगाव व राहाता तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.

यावेळी खा. सदाशिव लोखंडे, शिवसेना पक्ष निरीक्षक प्रशांत काळे यांचेसह जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार , जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, महिला जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे, बाजीराव दराडे, शाम गोसावी, देवा लोखंडे, ता .प्र. रावसाहेब थोरात, अक्षय जाधव, मनील नरोडे, बाबासाहेब बडे, प्रदिप देशमुख, राहाता तालुका प्रमुख सागर बोठे, कमलाकर शिलेदार , विनोद गलांडे, शहर प्रमुख अक्षय सदाफळ, किशोर तरटे, ऋतुराज चव्हाण, मिनाक्षी वाकचौरे, अनिता धनक, वनिता जाधव, सुनीता शेळके, अर्चना निबे आदिंसह मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!