श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- पदवीधारकांचे विविध प्रश्न सुटावेत, बेरोजगार पदवीधरकांना रोजगार मिळावा, पदवीधरकांना उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासारख्या असंख्य हेतुने स्थापन झालेल्या भाजपा पदवीधर प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य,भाजपा पदवीधर प्रकोष्ठचे महाराष्ट्र राज्य संयोजक तथा भाजपाचे कार्यकारिणी सदस्य मा. श्री. धनराज विसपुते सर यांच्या नेतृत्वाखाली
तसेच भाजपाचे अहमदनगर जिल्हा प्रभारी प्रदेशउपाध्यक्ष मा. श्री. माधव भंडारी साहेब,भाजपाचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. विठ्ठलराव लंघे पा. जिल्हा अध्यक्ष मा. श्री.दिलीपजी भालसिंग,भाजपाचे संघटन सरचिटणीस मा. श्री. नितीनभाऊ दिनकर, भाजपाचे सरचिटणीस मा. श्री. सुनीलजी वाणी, भाजपा लोकसभा प्रमुख मा. श्री. राजेंदभाऊ गोंदकर, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. श्री किरणजी बोराडे लोकसभा विस्तारक मा. श्री. योगिराज परदेशी , सोशल मीडिया प्रमुख मा. श्री. भाऊसाहेब वाकचौरे पा. यांच्या तसेच उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदवीधर प्रकोष्ठ यांच्या वतीने उत्तर – नगर जिल्ह्यातील सवाॅधिक पदवीधारकांची सदस्य नोंदणी करणार असल्याची माहिती भाजपा पदवीधर प्रकोष्ठचे उत्तर नगर जिल्हा संयोजक सागर भांड पाटील तसेच सहसंयोजक सचिन जोशी यांनी दिली आहे.