राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा):- जागतिक दर्जाचे आयएसओ 9001.2015 हे मानांकन प्राप्त कार्यालय व आदर्श गाव असणाऱ्या खडकेवाके गावास नुकतीच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 केंद्रीय कमिटीने भेट देऊन गावात तपासणी व पहाणी केली आहे राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ ग्राम सर्वेक्षण स्पर्धेच्या निमित्ताने या केंद्रीय कमिटीने गावाला भेट देऊन गावातील विविध विकास कामे उपक्रम तसेच योजनांची माहिती घेतली असल्याची माहिती गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच संगीताताई मुरादे यांनी दिली
खडकेवाके गावच्या तपासणी व भेटीसाठी आलेल्या या केंद्रीय कमिटीने गावातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सेवा सुविधा याची पाहणी केली गावातील या सर्वेक्षणात बिहार पॅटर्न अंतर्गत हजारो वृक्षांची केलेली लागवड व झाडांचे संवर्धन त्याचबरोबर शौचालयांचा वापर स्वच्छता परिसर स्वच्छता शासकीय योजनांची प्रभावीपणे होणारी अंमलबजावणी गावात राबविले जाणारे विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम यासंदर्भातील माहिती घेतली तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सेवा मूलभूत व नागरिक गरजा ग्रामपंचायत कार्यालयातून दिले जाणारे दाखले तसेच पायाभूत व मूलभूत सुविधा शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणीची पद्धत अशा एक ना अनेक प्रकारांची सविस्तर माहिती घेतली आहे खडकेवाके गावाने आज पर्यंत तालुका जिल्हा व राज्य पातळीवरील स्मार्ट ग्राम चे पुरस्कार प्राप्त केले आहे आता राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त करण्यासाठी खडकेवाके गाव प्रयत्नशील आहे त्या अनुषंगानेच गावात विविध उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील सहभागा मुळेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 केंद्रीय कमिटीने भेट देऊन गावात तपासणी व पहाणी केली असल्याचे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ संगीताताई मुरादे यांनी सांगितले.
या केंद्रीय कमिटीचे खडकेवाके ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच सचिन मुरादे उपसरपंच जालिंदर मुरादे ग्रामसेविका रूपाली निर्मळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी व नागरिकांनी मिळून जोरदार स्वागत केले गावातील संपूर्ण स्वच्छता परिसर हजारो झाडांनी बनलेले निसर्गरम्य वातावरण शाळा तसेच पाण्याची सुविधा यासह दशक्रिया विधी घाट गावातील धार्मिक स्थळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी व ग्रामस्थांतील एकोपा छोट्याशा गावात असलेली पार्किंग व्यवस्था यासह इतर उपक्रम व योजना बघून कमिटी भारावून गेली
राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील अर्थात या संपूर्ण परिवाराचे नेतृत्व व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन यामुळे खडकेवाके गावात विकासात्मक क्रांती झाली आहे मंत्री विखे पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांसाठी भरीव निधी दिला त्याचबरोबर विकासात्मक कामासाठी मोठे पाठबळ दिले त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खडकेवाके गावाने तालुका जिल्हा व राज्य पातळीवरील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त केले आहे आता राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी खडकेवाके गाव प्रयत्नशील आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीतून व सहकार्याने खडकेवाके गाव भविष्यात मोठे यश संपादन करील.
सौ संगीताताई मुरादे
(प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच खडकेवाके)