14.3 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

साई भक्त अनिलकुमार गुप्ता यांनी खडकेवाके गावात जिल्हा परिषद शाळेतील २०६ विद्यार्थ्यांना दिल्या मोफत स्कूल बॅग…

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व इतर शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठबळ व प्रोत्साहन देण्याचे आदर्श व प्रेरणादायी कार्य आदित्य केअर अँड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन साईभक्त अनिल कुमार गुप्ता करीत आहेत असे प्रतिपादन खडकेवाके गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सचिन मुरादे यांनी केले आहे.

दिल्ली येथील साईभक्त आदित्य केअर अँन्ड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अनिलकुमार गुप्ता यांनी आदर्श गाव असलेल्या खडकेवाके येथील गावठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुजमुले वस्ती पोकळे वस्ती जिल्हा परिषद शाळा सुमारे 206  विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व इतर शालेय साहित्याचे मोफत वाटप केले आहे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक गावातील ज्येष्ठ नागरिक मारुती मुरादे होते.

याप्रसंगी खडकेवाके गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सचिन मुरादे उपसरपंच जालिंदर मुरादे कामगार पोलीस पाटील रावसाहेब लावरे ग्रामपंचायत सदस्य दीपकराव गायकवाड सोमनाथ मुजमुले बाबासाहेब लावरे नरेंद्र मुरादे, शरद लावरे पत्रकार किरण वाबळे यांच्यासह अन्य मान्यवर या उपस्थित होते यावेळी बोलताना खडकेवाके गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणाले की आदित्य केअर अँन्ड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमातून संस्थापक अनिल कुमार गुप्ता नेहमीच निरपेक्ष व निस्वार्थी भावनेतून गावोगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व शालेय साहित्याचे वाटप करत असतात त्यांचा हा उपक्रम आदर्श व प्रेरणादायी आहे साईभक्त असलेले गुप्ता साई दर्शनासाठी आल्यानंतर या परिसरातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य रुपी मदतीचा हात देऊन शिक्षणासाठी पाठबळ व प्रोत्साहन देताहेत ही बाब खरोखरच वाखण्याजोगी असल्याचे मुरादे यांनी सांगितले.

खडकेवाके ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सरपंच सचिन मुरादे व शरद लावरे यांनी साईभक्त अनिल कुमार गुप्ता व मान्यवरांचा सत्कार केला सत्कार नंतर अनिल कुमार गुप्ता मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षणात कमी पडू नये तसेच स्पर्धेच्या युगात आर्थिक दुर्बल घटकातील अथवा गरजू विद्यार्थी शैक्षणिक साहित्य पासून वंचित राहू नये हाच या उपक्रमामाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या साहित्य रुपी मदत लागल्यास आपण त्यासाठी पुढाकार घेऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला याप्रसंगी मारुती मुरादे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल मुजमुले यांनी केले तर आभार प्रदर्शन कुदळ सर यांनी मानले प्रीती नरवडे, शिक्षक नेते अरुण मोकळ ,स्वप्नील फाफाळे ,चंद्रभान नळे, सदगीर सर,उकिर्डे सर, गाडेकर सर उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!