श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ): – भारताच्या इस्ञोची चांद्रयान ३ मोहिम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल भारत राष्ट्र समितीच्या वतीने गांधी पुतळ्याजवळ फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
भारत हा चंद्राच्या दक्षिण धृवावर यान उतरविणारा जगातील पहिला देश ठरला आहे. हि अभिमानास्पद कामगिरी पार पाडल्याबद्दल आणि चांद्रयान चंद्रावर उतरताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गांधी पुतळ्याजवळ फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
यावेळी युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, नाना पाटील, गणेश छल्लारे, महेश पटारे, प्रवीण फरगडे, अमोल कोलते, बाबासाहेब पवार, संदिप डावखर, विशाल धनवटे, संकेत संचेती, नवाब सय्यद, कैलास भागवत, किरण शेळके, जयेश परमार, संजय मोरगे, दादासाहेब मोरगे, दत्तात्रय सलालकर, सुहास भागवत, अन्वर शेख, अभिजित शिंदे, सुधीर गायकवाड, किरण रणनवरे, पंकज देवकर आदी उपस्थित होते.
चांद्रयान-३ मोहिम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल इस्ञोच्या सर्व शास्ञज्ञ व टिमचे भारत राष्ट्र समिती, लोकसेवा विकास आघाडी आणि अशोक उद्योग समूहाच्या वतीने हार्दिक अभिनंदन!
इस्ञोच्या सर्व शास्ञज्ञ व टिमच्या कर्तृत्वाचा तमाम भारतीयांना सार्थ अभिमान आहे. या यशामुळे भारताची शान आणि मान जगात उंचावली आहे.
(भानुदास मुरकुटे, माजी आमदार)