लोणी दि.१९( जनता आवाज वृत्तसेवा ):-शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या 33 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरुष आणि महिला तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२३ मध्ये कु.प्रतिक्षा रावसाहेब देवरे हिने ६७ किलोखालील वजन गटात कांस्यपदक पटकावले.त्या लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या प्रवरानगर येथील प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये तायक्वांदो प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे म्हणाले,मैदानी खेळावरचं जलतरण अशा विविध क्रिडा स्पर्धेतून प्रवरेच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन होत आहे.यासाठी प्रशिक्षक प्रा.दिनेश राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा.डाॅ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुश्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालक शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे सहशिक्षण अधिकारी प्रा. नंदकुमार दळे,संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे,प्राचार्या रोजबिन बेली,क्रिडा शिक्षक प्रा.रविंद्र भणगे,प्रा.किरण कडसर यांनी अभिनंदन केले.