spot_img
spot_img

पद्यश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील जयंतीनिमित्त प्रवरा कन्या विद्या मंदीर येथे विविध क्रिडा स्पर्धा

लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा कन्या विद्या मंदीर, लोणी या विद्यालयात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंती सप्ताह निमीत्ताने विविध क्रीडा स्पर्धासह निंबध, रांगोळी अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून यामाध्यमातून विद्यार्थीनीच्या कलागुणांना मोठी संधी मिळत आहे अशी माहीती प्राचार्या भारती कुमकर यांनी दिली.

सहकारी चळवळीचे जनक पद्यश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील जयंती निमित्त संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे वतीने क्रिडा स्पर्धेसह विविध कार्यक्रम या सप्ताहनिमित्त होत आहेत.

विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थिनीचा तसेच शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. प्रसंगी कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धा इत्यादी उत्साहात पार पडल्या. तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये हॉलीबॉल चा चुरशीचा सामना रंगला. विद्यालयाच्या किरण बेदी कुलातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी पर्यवेक्षक रामचंद्र लबडे,क्रिडा शिक्षिका विद्या घोरपडे,कल्पना कडू,सुरेश गोडगे,वैशाली जाधव,रविंद्र डेंगळे,निशाली शेजुळ आदी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!