spot_img
spot_img

युवक व युवती ह्यांनी नवीन मतदार नोंदणी अभियानात जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घेऊन आपली नावे मतदार यादीसाठी नोंदणी करावी- आ. प्राजक्तदादा तनपुरे

राहुरी २६( जनता आवाज वृत्तसेवा ):-भारतीय राज्य घटनेने वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक युवक व युवतीला लोकशाही मध्ये मतदान करण्याचा हक्क दिला असून आपला हा हक्क बजावण्यासाठी आपले नांव मतदार यादीत येणे आवश्यक आहे त्यासाठी ह्यांनी आपली वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक व युवती ह्यांनी नवीन मतदार नोंदणी अभियानात जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घेऊन आपली नावे मतदार यादीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी यांनी केले आहे.

नवीन मतदार नोंदणी करणे हे लोकशाही व राज्यघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने आपली नावे मतदारयादीत नोंदणे गरजेचे असून अश्या नवीन मतदार युवक व युवती ह्यांनी नोंदणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.यासाठी आपण आमदार प्राजक्त दादा तनपुरे संपर्क कार्यालय येथे संपर्क करून मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स घेऊन ते शासकीय कार्यालयात किंवा मतदार नोंदणी अधिकारी जमा करतील यामुळे आपली नवीन मतदार नोंदणी करता येईल.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!