नगर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागताला वृक्षारोपणाची जोड देण्याचा सुरेख संगम असलेला कार्यक्रम संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित मध्ये पार पडला. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. रामचंद्र दरे साहेब, संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. जी. डी खानदेशे साहेब त्याचबरोबर संस्थेचे विश्वस्त मा. डॉ. चंद्रराव मोरे साहेब हे देखील उपस्थित होते.
‘झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा’, या म्हणीला सार्थ करत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत महाविद्यालयाच्या आवारात वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे सर यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून देत लावलेल्या झाडांचा उपयोग प्रदूषण कमी करण्यासाठी कसा होईल याविषयी आपले मत मांडले. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे नियोजन ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एन एस एस) अधिकारी प्राध्यापक जी. एस. पाटील सर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रथम वर्ष विभागाच्या समन्वयक डॉ. एम. के. भोसले, सिव्हील विभागाचे प्रमुख प्रा. पी. जी. निकम, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख प्रा. एस. एम. वाळके, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. जगताप, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. ए. बी. काळे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकारी प्रा. अक्षय देखणे, प्रा. अमेय कुलकर्णी आदींचे सहकार्य लाभले.



