राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):-किसान मित्र फौंडेशन अंतर्गत दि. २५ नोव्हेंबर२२ पासून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच गरीब व गरजू विधवा महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देवून प्रत्यक्ष रोजगार निर्मिती उपक्रम राबविण्यात येतो
त्यामध्ये शिवणकाम करणाऱ्या महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून जातो तसेच या महिलांसाठी एका दिवसाचे प्रशिक्षण वांबोरी फाटा येथे देण्यात येते या प्रशिक्षणाचे प्रमुख सौ.गाणार मॅडम व मिनाज शेख मॅडम या प्रशिक्षण देतात . तसेच शिवणकाम करणाऱ्या महिलांसाठी टेलरिंग काम रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांना गांधी, कांजी टोपी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
त्यामध्ये कांजी टोपी प्रत्येक महिलेकडून शिवणकाम करून घेण्यात येते व त्यामध्ये ज्या महिला शिवणकाम चांगले करतात त्यांना वर्षभर आम्ही आमच्या फौंडेशनच्या अंतर्गत टोपी बनवण्यासाठी लागणारे कापड कटीग करून ते महिलांना त्यांच्या घरी देतो त्यामुळे त्यांच्या घरी कुटुंब सांभाळून रोजगार उपलब्ध होतो व त्यांना घर चालवण्यासाठी पैसे मिळतात त्यासाठी आमचे किसान मित्र फौंडेशनचे कर्मचारी हे माल घरपोहोच उपलब्ध करतात. व महिलांनी शिवणकाम झाल्यांनतर ते घेवून येणे व आमच्या किसान मित्र फौंडेशनच्या ऑफिस मध्ये जमा करणे तसेच त्यांचे पेमेंट वेळेवर त्यांच्या खात्यावर जमा करणे. अशी कामे फौंडेशनच्या अंतर्गत केली जातात.तसेच त्यांना शिवणकामाचे प्रशिक्षण त्यांच्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी टेलरिंग टीचर मिनाज शेख या देतात. हे प्रशिक्षण महिलांना मोफत दिले जाते तसेच प्रत्येक महिलेकडून प्रत्येकी दिवशी ३०० कांजी टोपी शिवून घेण्यात येते.व त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
हे काम किसान मित्र फौंडेशन अंतर्गत उपलब्ध करून दिले जाते. आम्ही राहुरी तालुक्यातील वरवंडी, बाभूळगाव, मुळानगर, विद्यापीठ, खंडाबे, धामोरी, गोटुंबे आखाडा, राहुरी खुर्द, डीग्रस, वांबोरी इ. ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
अशा गावामध्ये टेलरिंग काम करणाऱ्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले जाते. जास्तीत जास्त महिलांना रोजगार देण्यासाठी व तसेच ज्या महिला शिलाई मशीन घेवू शकत नाही त्यांना शिलाई मशीन घेण्यासाठी कंपनी, संस्था व व्यक्तींनी मदत करावी या साठी किसान मित्र कार्यालयाशी संपर्क करावा .



