राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):-के के रेंज साठी आरक्षित झालेली एक गुंठा शेतकऱ्यांची जमीन जाऊ देणार नाही लवकरच या शेतकऱ्यांना आपल्या जमिनी परत मिळून देऊ असे प्रतिपादन राज्याचे महसूल व पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी की राहुरी नगरपरिषद राहुरी च्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभिमान राज्यस्तरांतर्गत राहुरी शहरी गटार योजनेला १३४ कोटी ९८ लक्ष रुपयांचा पहिला टप्पा मंजूर झाला असून त्यापैकी ९२ कोटी ९८ लाख रुपये मंजूर झाले आहेत या कामाचा शुभारंभ २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता राहुरी येथील नवी पेठ येथे राज्याचे महसूल व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी चेअरमन व ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदींच्या उपस्थितीत पार पडला.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की चंद्रयान यशस्वी करून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अधिपत्याखाली भारत देश महा सत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे संवेदनशील पंतप्रधान आपल्या देशाला नरेंद्रजी मोदी यांच्या रूपाने संवेदनशील पंतप्रधान लाभले आहेत सामान्य माणसांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे वाळू तस्करी कमी करण्यासाठी महाराष्ट्र मध्ये आम्ही जे धोरण अवलंबले त्या धोरणामुळे आज मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कमी झालेली आहे सरकार बरोबरच सामान्य माणसांपर्यंत योजना पोहोचाव्यात यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे आम्ही विकासाच्या कामांमध्ये कधी मागे राहणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न देखील सोडवण्यासाठी हे सरकार आग्रही आहे आत्तापर्यंत कधीही जाहीर झाला नाही एवढा २४१० रुपयांचा भाव शासनाने कांद्याला जाहीर केला आहे. सहकारी कारखानदारी जगावी यासाठी केंद्र शासनाने सहकारी साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे इन्कम टॅक्स मध्ये सूट देऊन त्यांनी या कारखान्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर जो कारखाना ऊसाला अधिकचा भाव देईल त्याला इन्कम टॅक्स देखील माफ होणार आहे इथेनॉल चे धोरण अवलंबल्यामुळे सहकारी साखर कारखाने सुस्थितीत येण्यासाठी मदत होणार आहे सध्या पाऊस नसल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे मात्र गेल्या वर्षी पाच हजार शेतकऱ्यांनी या तालुक्यांमध्ये पिक विमा उतरवले होते त्याचे संख्या केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा असल्याने आज ५४ हजारावर गेले आहे यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे लवकरच ज्यांची पिके गेली त्या ठिकाणी पंचनामे सुरू होणार आहेत शेतकऱ्यांना दिलासा म्हणून एक सप्टेंबर पासून मुळा उजव्या कालव्याला देखील पाणी सोडण्यात येणार आहे या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करीत आहे के के रेंज बाबत बोलताना नामदार विखे यांनी सांगितले की लवकरच देशाचे संरक्षण मंत्री लोणी येथे येणार आहेत त्यांच्या माध्यमातून केके रेंजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल कोणत्याही शेतकऱ्यांची एक गुंठा देखील जमीन केके रेंज साठी दिले जाणार नाही याबाबत शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे.
यावेळी बोलताना खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी सांगितले की लोकसंख्या वाढीप्रमाणे राहुरी शहराचा विकास करणे ही आज काळाची गरज आहे गेल्या पन्नास वर्षात राहुरी चा विकास जसा झाला नाही तो आम्ही करून दाखवू त्यासाठी आम्ही योजना तयार केले आहेत येत्या एक महिन्यांमध्ये शासनाची ११ हेक्टर जमीन राहुरीकरांसाठी देऊन या जमिनीवर प्रशासकीय इमारत पोलीस स्टेशन शासकीय दवाखाना त्याचबरोबर पाच एकर जागा ज्यांना घर बांधण्यासाठी जमीन नाही अशा प्रत्येक कुटुंबाला अर्धा गुंठा जमीन देण्यासाठी आरक्षित केली जाणार आहे एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यालय आणण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही यशस्वी करणार आहोत त्यातून राहुरी चा विकास साधणार आहोत त्याचबरोबर ज्या ठिकाणी सध्या शासकीय ऑफिस आहेत त्या ठिकाणी नंतर कॉम्प्लेक्स बांधून शहरातील व्यापारी बांधवांना देखील व्यापारासाठी मोठे संधी निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या माध्यमातून व्यापार वाढणार आहे व राहुरी चा विकास नक्कीच होणार आहे मागील काही वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी राहुरी चा विकास करण्याचा प्रयत्न केला नाही हे देखील दुर्दैव आहे एकाच कुटुंबाकडे सत्ता असताना देखील त्यांनी शहराचा विकास केला नाही राहुरीकरांनी त्यांना अनेक वेळा सत्ता दिली मात्र आता विकास काय असतो हे आम्ही राहुरीच्या जनतेला दाखवून देऊ के के रेंज बाबत शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे मी खासदार म्हणून या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना मिळाव्यात यासाठी आग्रह आहे एकही शेतकऱ्याची जमीन जाऊ देणार नाही त्यांच्या प्रपंचासाठी खासदारकी पनाला लावू आम्ही तत्त्वाशी तडजोड करणारे नाहीत शेतकऱ्यांसाठी लढू केंद्रीय संरक्षण मंत्र्यांकडून हे काम करून घेऊ याबाबत त्यांनी निश्चिंत राहावे असे देखील यावेळी खासदार विखे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, राज्यात व देशात भाजपाचे सरकार आहे त्यामुळे आपल्याला सर्व विकास कामे करून घेता येतात लोकांनी भावनेला बळी पडून विरोधी आमदार निवडून दिला त्यांना मंत्री केले गेले मात्र नागरिकांच्या कोणत्याही अपेक्षा त्यांनी पूर्ण केले नाहीत दिलेले आश्वासने त्यांनी पूर्ण केलेले नाहीत केंद्र शासनाच्या धोरणामुळे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सर्वांना पिण्याचे पाणी मिळावे याबाबतच्या योजना जाहीर केल्या मात्र यांचा कोणताही सहभाग नसल्याने आम्ही केलेल्या भूमिपूजनानंतर त्यांनी श्रेय घेण्यासाठी भूमिपूजन सुरू केली मात्र जनता वेळी नाही आपले नाकर्ते पण झाकण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे योजना जर केंद्राची असेल तर त्यात यांचा संबंध काय असा प्रश्न देखील यावेळी कर्डिले यांनी उपस्थित केला त्याचबरोबर यांची कर्तबदारी काय असाही प्रश्न उपस्थित केला ग्रामीण रुग्णालयासाठी मी स्वतः आमदार असताना निधी आणला मात्र मला श्रेय मिळू नये म्हणून नगरपालिका यांच्या ताब्यात असल्याने त्यांनी साधी एनओसी देखील दिले नाही वांबोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्याचे श्रेय देखील घेण्याचा प्रयत्न यांचा सुरू आहे मात्र आता शासन आमच्या आहे हे यांनी लक्षात घ्यावे यावेळी कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर सळकून टीका केली जमिनी बळकवणाऱ्या या लोकांना विकासापेक्षा मलिदा महत्त्वाचा आहे नगर मनमाड महामार्गाच्या ठेकेदाराला टक्केवारी कोणी मागितली असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आम्ही सत्तेवर असो अथवा नसो तरीदेखील विकासासाठी झटून अन्यायाच्या मागे उभे राहणारे आम्ही आहोत असे सांगत केके रेन चा प्रश्न सोडवा व उजव्या कालव्याला पाणी सोडवा अशी मागणी त्यांनी यावेळी करत यापुढील सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच लढवाव्यात असे सांगत उद्याचे खा. डॉ. सुजय दादा विखे हेच राहणार असल्याचे देखील स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ नेते अॅड सुभाष पाटील यांनी सांगितले की विखेंनी काही केले की त्याची पुनरावृत्ती करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करीत आहेत मंजूर करून आणलेल्या कामाचे भूमिपूजन पार पडले की तेथे जाऊन पुन्हा भूमिपूजन करायचे हा त्यांचा अजेंडा आहे आता मात्र त्यांच्या पक्षाची एका खोलीत बसावे एवढेच आमदार राहिले आहेत आत्ता सत्ता भारतीय जनता पार्टीचे आहे आता कोणाला भूमिपूजनाला बोलावावे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे राहुरीतून नामदार विखे यांची मिरवणूक निघते हा नेहमी शुभ संकेत राहिलेला आहे नामदार विखे हे संधीचे सोने करणारे असून तालुक्याच्या विकासामध्ये त्यांच्यामुळे मोठी भर पडणार आहे.
यावेळी बोलताना तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी सांगितले की, वेळोवेळी पाठपुरावा करून या योजनेसाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व खा.सुजय दादा विखे पाटील यांच्या मदतीने १३४ कोटी ९८ लाख रुपये निधी मंजूर करून आणलेला आहे या साठी त्यांनी अनेक दिवस कष्ट घेऊन विविध कागदपत्रांची पूर्तता केली त्याचबरोबर अनेक वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कडे नामदार विखे यांच्या माध्यमातून जाऊन हा निधी मंजूर करून घेतलेला आहे. याचे श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये शहराच्या विकासात यामुळे मोठी भर पडणार आहे भूमिगत गटारी झाल्यानंतर शहरांच्या रस्त्यांची दुरावस्था होणार आहे हे रस्ते होण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर मुळा नदीच्या कडेला राहुरी शहरालगत संरक्षण भिंत बांधण्यात यावी ग्रामीण रुग्णालयाला निधी मंजूर करावा प्रशासकीय इमारत बांधून मिळावी बस स्टॅन्डचा प्रश्न मार्गी लावा अशा मागण्या केल्या.
या आर आर तनपुरे, दादा पाटील सोनवणे, शामराव निमसे, सुरसिंगराव पवार, दत्तात्रेय ढुस, कारभारी डौले, चांगदेव भोंगळ, अतिक बागवान, गणेश खैरे, अण्णा शेटे, नयन शिंगी, सोन्याबापू जगधने, अॅड संदीप भोंगळ, नारायण धोंगडे, शिवाजी गाडे, प्रफुल्ल शेळके, अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, सुधीर धुमाळ, केमा पाटील, प्रकाश पारख, डॉ. धनंजय मेहेत्रे , राजेंद्र उंडे,कैलास माळी,दिपक मेहेत्रे, राजेंद्र म्हसे,सुभाष वराळे, प्रदीप भुजाडी, ज्ञानेश्वर पोपळघट, देवेंद्र लांबे, दादासाहेब तोडमल, अशोक वामन, आबासाहेब येवले, सुरेश भुजाडी, शिवाजीराव डौले, मधुकर पोपळघट, रंगनाथ तनपुरे,सचिन म्हसे, अजित डावखर, भाऊसाहेब काकडे, अक्षय तनपुरे, सुजय काळे,कांतीराम वराळे, गोपाळ अग्रवाल, चांगदेव भोंगळ, राजेंद्र वराळे, ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे यांच्यासह भाजपाचे व विकास मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डॉक्टर धनंजय मेहत्रे यांनी मांनले.
यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी येथील कचरा डेपोसाठी असणाऱ्या जागेचा उतारा नगरपालिकेचा नावावर करून सुपूर्त केला.
यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की यापुढे सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या पक्षावर लढवाव्यात निधी मागायला येताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून रावसाहेब चाचा तनपुरे यांनी यावे त्यासाठी लवकरात लवकर पक्षप्रवेश करून घ्यावा हे त्यांनी यावेळी गांभीर्याने सांगतले.



