spot_img
spot_img

डाळिंबरत्न बाबासाहेब गोरे यांना शिवपुत्र व शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार 

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय शिवपुत्र व शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार राहाता तालुक्यातील राजुरीपुत्र डाळिंबरत्न बी. टी. गोरे तथा बाबासाहेब तुकाराम गोरे यांना प्रदान करण्यात आला.

डाळिंबरत्न बी. टी. गोरे शेतीमध्ये नव नवीन प्रयोग करत तंत्रज्ञान विकसित केले. डाळिंब शेती खर्‍या अर्थाने त्यांनी शाश्वत केली. निव्वळ डाळिंबच नाही तर एकरी २५ क्विंटल सोयाबीनचे आणि २५ टन कांद्याचे उत्पादन तंत्रही त्यांनी विकसित केले. या तंत्रज्ञानात भर पाडण्यासाठी इस्रायल, अमेरिका, चीन, सिंगापूर, जर्मनी, नेदरलँड, स्पेन, श्रीलंका इत्यादि देशातही त्यांनी अभ्यास दौरे सुद्धा केले. तंत्रज्ञान विकसित झाल्यावर ते इतर शेतकर्‍यांपर्यंत पोहचवायचे या उद्देशाने त्यांनी २०११ साली प्रशिक्षण संस्था सुरू केली, भारतामधील विविध राज्यांमध्ये जाऊन आतापर्यंत हजारो मोफत प्रशिक्षणे दिलेली आहेत. या सर्व कामांचा आढावा घेत अनेक नामांकित संस्थांनी त्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित केलेले आहे. ज्यामध्ये प्रथम मानाचा डाळिंबरत्न पुरस्कार, जीवन गौरव, अग्रीकेअर आयडॉल, बेस्ट अग्रीप्रिन्यूअर अवॉर्ड, सन ऑफ सॉइल, चाई अप्रिशियेशन अवॉर्ड आणि अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी ॲग्री  ॲकॅडमी   नावाचे अजून एक मोबाइल  ॲप्लिकेशन  तयार केले. या ॲप्लिकेशनच्या  माध्यमातून डाळिंब, सोयाबीन, कांदा अशा अनेक पिकांचे तंत्रज्ञान व्हिडिओ आणि ईपुस्तकाच्या स्वरुपात दिलेले आहे.

शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित या कार्यक्रम प्रसंगी व्याख्याते, इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे पाटील, योगा विभागाच्या महाराष्ट्र राज्य ब्रँड अँबेसिडर सौ. प्रज्ञा पाटील, शहीद स्कॉडरंट लीडर निनाद मांडवगण यांच्या मातोश्री सौ. सुषमा मांडवगणे, रिचफिल्ड फर्टीलायझरचे संस्थापक डॉ. स्वप्नील बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते संतोष मराठे, शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी या पुरस्काराने सिंधुताई सपकाळ, पोपटराव पवार, शितल महाजन अशा मान्यवरांनाही गौरविण्यात आलेले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!