spot_img
spot_img

जीवन कौशल्यांचा विकास शिक्षणातून होणे गरजेचे: प्रा. गिरीश कुकरेजा

नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासामध्ये मानसिक क्षमतांचा जास्तीत जास्त उपयोग करून शिक्षण अधिकाधिक जीवनकेंद्रित करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो, असे मत प्राध्यापक गिरीश कुकरेजा यांनी नेप्ति येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज अभियांत्रिकी विद्यालय येथे व्यक्त केले. महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.) अंतर्गत आयोजित ‘कम्युनिकेशन आणि लाइफ स्किल’ या व्याख्यानामध्ये ते बोलत होते. व्यक्तिचा सर्वांगिण विकास करणे हे शिक्षणाचे अंतीम उद्दिष्ट मानले जाते. जीवन जगताना आनंदी राहायला शिका आणि शैक्षणिक कलागुणांकडे लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी येाग्य वेळी योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे, असे प्रतिपादन केले. जीवन कौशल्य शिक्षणासाठी हे मुलभूत कौशल्य आहे, आणि अशा प्रकारची व्याख्याने ही विद्यार्थ्यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवितात हे देखील त्यांनी सांगितले.

प्रा. गिरीश कुकरेजा यांचे प्रभावी वक्तृत्व आणि विनोदशैलीमुळे विद्यार्थ्यांना ‘कम्युनिकेशन आणि लाइफ स्किल’ हा विषय सहजरीत्या समजायला मदत झाली. कुकरेजा सरांचे व्याख्यान पुन्हा पुन्हा महाविद्यालयात आयोजित करावे असा अभिप्राय विद्यार्थ्यांनी दिला.

कार्यक्रमाची नियोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. गिरीश पाटील सर आणि प्रथम वर्षाच्या विभागप्रमुख डॉ. एम. के. भोसले मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. अक्षय देखणे यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!