लोणी दि.२८( जनता आवाज वृत्तसेवा ):-आयुर्वेद’ ही चिकित्सा पद्धती प्राचीन काळापासून देशात अस्तित्वात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही आयुर्वेदाचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे आजही अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरले आहेत, वैज्ञानिक युगात आयुर्वेदाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक असाध्य रोगांवर उपचार करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येकजण आयुर्वेदाचे महत्त्व समजायला लागला आहे रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी आयुर्वेद’ ही चिकित्सा पद्धती ही काळाची गरज आहे.म्हणून डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लोणी यांच्या वतीने होणारे शिबिर महीलांसाठी महत्वपुर्ण ठरत आहे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डाॅ.निलेश बनकर यांनी केले.
राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे पायरेन्सच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,जनसेवा फौंडेशन,लोणी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात डाॅ.बनकर बोलत होते.
जनसामान्याच्या हितासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रवरासमूहाचे कार्य सर्वश्रुत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा मजबूत करण्याकरता संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यकार्यकारी अधिकारीडॉ. सुप्रियाताई ढोकणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरजवंतांच्या सेवेसाठी प्रवरासमूहातर्फे विविध प्रकारच्या आरोग्य विषयक मोफत शिबिरांचे आयोजन केले जाते त्याचाच एक भाग म्हणून आज दाढ बू येथे दिनांक २८ आणि २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत महिलांसाठी, सर्व रोग निदान तपासणी व उपचार, रक्त चाचणी, गर्भाशय मुख कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रारंभी पायरेन्स आयबीएमचे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी शिबीराचा उद्देश विषद केला. यावेळी डॉ. श्रीधर गागरे, डॉ.गौतम आहेर यांनी महीलांचे आजार आणि गर्भशयमुख कर्करोग याविषयी माहीती दिली. शिबिरामध्येमोफत निदान करून सल्ला व मार्गदर्शन करण्यात करण्यात येऊन मोफत औषधी चे वाटप करण्यात येणार आहे मंगळवार पर्यंत सुरू असणा-या परिसरातील सर्व महिला माता भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी माजी सरपंच सौ.पुनम योगेश तांबे, प्राथमिक आरोग्य केंद्र,वेद्यकिय अधिकारी डाॅ.श्रीधर गागरे,संकेत मोरे, डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांचे डॉ. स्वप्नाली बारी डॉ.कविता आहेर, डॉ.अमित विलायेते डॉ.कुलदीप राजपूत ,डॉ.गौतम आहेर श्री. बाळाराम सांगळे, बचत गटाच्या पार्वती बनगैय्या, गट प्रवर्तक प्रतिभा वैद्य यांचे सह आयुर्वेदिक महाविद्यालयाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते. मंगळवार पर्यत हे शिबीर महिलासाठी सुरु असणार आहे.



