लोणी दि.२९( जनता आवाज वृत्तसेवा ):- लोकने पद्मभूषण माननीय डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय, लोणी येथे अंतिम वर्षात शिकत असलेल्या गायत्री लबडे, संजीवनी पावरा, पल्लवी शिंदे, अमृता बिक्कड, प्रांजल बांगर व मानसी कांबळे या कृषीकन्यांच्या मदतीने श्री लक्ष्मी नारायण विद्यालय, वाकडी येथे करीयर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कृषी संलग्नित महाविदयालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभल्या, त्याचबरोबर प्रा. रमेश जाधव हे कार्यक्रम समन्वयक आणि डॉ. दिपाली तांबे या कार्यक्रम अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.
विद्यार्थ्यानी करियर दिशा निश्चित करण्यासाठी कोणत्या प्रकारे तयारी केली पाहिजे? आपली दिशा करियर कशी निवडावी? करियरसाठी विविध क्षेत्र कोणकोणती आहे? या विषयांवर तज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत वाकडी पंचक्रोशीतील जवळजवळ १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी करियर मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद दिला.
याप्रसंगी शाळेचे उपप्रमुख श्री. निर्मळ सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रम अध्यक्ष म्हणून श्री राजेंद्र लहारे, गावचे माजी सरपंच डॉ. संपत शेळके श्री. बाळासाहेब कोते, श्री बापूसाहेब लहारे, अँड. अतुल लहारे, श्री सुरेश जाधव तसेच अनेक महिला पालक उपस्थित होते.



