श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-हरेगाव येथे घडलेली घटना अमानवीय व माणुसकीला काळिमा फासणारी असून गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक मा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे. हरेगाव येथील चार तरुणांना कबुतरे चोरल्याच्या संशयावरून अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
सदरची घटना ही श्रीरामपूरच्या संस्कृतीला शोभणारी नसल्याचेही ससाणे यांनी म्हटले आहे. हरेगाव येथील घटनेचा श्रीरामपूर तालुका काँग्रेस व श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देत तीव्र निषेध करण्यात आला. याप्रसंगी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, प्रेमचंद कुंकूलोळ, प्रवीण नवले, भारत बढे, सुनील शिनगारे, अशोकराव जगधने, युवराज फंड, सनी मंडलिक, सुनील साबळे, राहुल कोठारी, सूर्यकांत चाबुकस्वार, दिपक नवगिरे, गणेश काते, अजय धाकतोडे, सागर दुपाटी उपस्थित होते.



