spot_img
spot_img

शिर्डी येथील पोलीस हवालदारास लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून अटक

राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):-विनयभंगाच्या गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी तसेच तडीपार व एम पी डी ए अन्वये कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षक साठी एक ते दीड लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

त्यानंतर दि २६ जुलै रोजी आरोपी पोलीस हवालदार संदीप गडाख यांनी पोलीस निरीक्षक यांची साठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती म्हणून शिर्डी पोलीस स्टेशनच आरोपी लोकसेवक पोलीस हवालदार संदीप गडाख वय ४० वर्ष याचे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसेच लातूरचा प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैशाली पाटील पोलीस नाईक शरद हेंबाडे पोलीस नाईक राजेंद्र गीते चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांचा समावेश होता या घटनेने मात्र पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!