श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-बेलापुरकरांनी रक्षाबंधनानिमित्त राखी बांधुन आम्हा पोलीस बांधवांचा आत्मविश्वास वाढवीला असुन आम्ही आमच्या कर्तव्याप्रति बांधील असलो तरी आपल्या या गौरवाने, स्नेहाने आमचा आत्मविश्वास आणखीनच दृढ झाला आहे .आमची खाकी हीच आमची राखी असली तरी आपल्या गौरवाने आम्ही भारावुन गेलो आहोत असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी व्यक्त केले.पोलीस बांधवांना कर्तव्य बजावताना कुठलेच सण, उत्सव कुटुंबासमवेत साजरे करता येत नाही .पोलीसदादा हे कायम जनतेची सेवा करत असतात त्यामुळे गेल्या काही वर्षापासून पत्रकार देविदास देसाई यांच्या संकल्पनेतुन पोलीस बांधवांना राखी बांधुन रक्षाबंधन साजरा करण्याची आगळी वेगळी परंपरा गावात सुरु करण्यात आली.
गावातील महीलांनी पोलीस दादांचे औक्षण करुन दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुही आमच्या ,,ग्रामस्थांच्या पाठीशी भावाप्रमाणे भक्कम उभा रहा अशी साद उपस्थित महीलांनी पोलीस दादांना घातली त्या वेळी उपस्थित सर्व पोलीस अधीकारी व कर्मचारी भावना विवश झाले अनेकांच्या डोळ्यात तर अश्रु तरळले .या वेळी रक्षाबंधनांच्या संकल्पनेविषयी बोलताना पत्रकार देविदास देसाई म्हणाले की आपल्या कुटुंबापासुन दुर राहुन पोलीस दादा आपल्या सर्वांचे रक्षण करतात. दिवस रात्र त्यांची गस्त असते त्यामुळेच आपण सुरक्षित रहातो इच्छा असुनही त्यांना रक्षाबंधनाला घरी जाता येत नाही.
हे लक्षात घेवुन पत्रकार व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने बेलापुर पोलीस स्टेशन येथे सर्व पोलीस बांधवा समवेत रक्षाबंधन सुरु करण्याची परंपरा सुरु करण्यात आली आहे या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या गुंफा कोकाटे व जयश्री उंडे यांनी तुम्हीच आमचे दादा आहात गावातील सर्व बहीण भावांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा.सध्या चर्चेत असणारा कायम मदतीला धावुन येणारा एकच दादा आहे तो म्हणजे पोलीस दादा त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सदा सुखी ठेव अशी आशा व्यक्त केली या वेळी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे एपीआय जीवन बोरसे सहाय्यक फौजदार सुधीर हापसे ,पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे काँन्स्टेबल नंदकुमार लोखंडे हरीष पानसंबळ,संपत बडे ,भारत तमनर आदिंचे औक्षण करुन सर्वांना राखी बांधुन रक्षाबंधन साजरा करण्यात आला .या वेळी सौ जयश्री अनभुले उंडे ,प्राचार्या गुंफा कोकाटे ,सर्प मित्र राजश्री अमोलीक सौ प्रतिभा देसाई, सौ संगीता देसाई ,प्रेरणा दिलीप दायमा ,जि प सदस्य शरद नवले ,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,एकनाथ नागले अजीज शेख ,दत्ता कुर्हे प्रकाश कुर्हे पत्रकार सुहास शेलार किशोर कदम दिलीप दायमा,असलम बिनसाद,बाबा शेख शफीक आतार एजाज सय्यद जयेश अमोलीक , अक्षय देसाई उपस्थित होते पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी आभार मानले



