spot_img
spot_img

श्रीरामपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावाः सुरेश गलांडे

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – अपुरा पाऊस आणि खंडीत वीज पुरवठा यामुळे खरीपाची पिके जळून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे यांनी केली.

भारत राष्ट्र समितीच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री.गलांडे बोलत होते.

भारत राष्ट्र समितीच्या महिला आघाडीच्या सौ.मंजुश्री मुरकुटे म्हणाल्या की, तालुक्यात तीन महिने झाले तरी पाऊस नाही. पाण्याची पातळी खालावली आहे. पाऊस नसल्यामुळे शेतातील उभी पिके जळून जावून शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च वाया गेला आहे. त्यात वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने आणखीनच मोठे संकट उभे राहिले आहे. अशास्थितीत हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असे त्या म्हणाल्या.

निवेदन देतेवेळी पुंजाहरी शिंदे, ॲड्.सुभाष चौधरी, भाऊसाहेब उंडे, प्रा.सौ.सुनिताताई गायकवाड, नाना पाटील, काशिनाथ गोराणे, सोन्याबापू शिंदे, दशरथ पिसे, किशोर बनसोडे, दत्तात्रय नाईक, विरेश गलांडे, ज्ञानेश्वर काळे, यशवंत रणनवरे, वाय.जी.बनकर, आबासाहेब गवारे, गणेश छल्लारे, अमोल कालंगडे, शिवाजीराव मुठे, शिवाजी शिंदे, संजय लबडे, ज्ञानेश्वर शिंदे, सुनिल बोडखे, महेश पटारे, भागवत पटारे, राजेंद्र लांडगे, बाळासाहेब राऊत, कैलास चव्हाण, अमोल कोलते, संपतराव मुठे, भाऊसाहेब बनसोडे, शिवनाथ आव्हाड, रामनाथ सांगळे, मधुकर बनसोडे, बबनराव आसने, राजेंद्र काळे, संजय बनकर, साहेबराव बोठे, साहेबराव गायकवाड, राजेंद्र गायकवाड, लक्ष्मण चौधरी, गोकुळ देसाई, ललित देवी, जितेश कंत्रोड, भाऊसाहेब पटारे, दत्तात्रय पटारे, दिपक झुराळे, रंगराव रंजाळे, बाबासाहेब मोरगे, बबनराव उंडे, आशिष दोंड, प्रविण फरगडे, कैलास भागवत, अरुण भराडी, बाळासाहेब शिंदे, सतिष मांढरे, विकी बनकर, बाळासाहेब चौधरी, प्रविण गवारे, जयेश परमार, सागर अमोलिक, पंढरीनाथ मते, इम्रान शेख, संजय मोरगे, मुकूंद कारभार, पंकज देवकर, नानासाहेब निकम आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!