spot_img
spot_img

डॉ. के. वाय. गाडेकर माध्यमिक विद्यालयाच्या वतीने राहाता येथील पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता येथील डॉ.के.वाय.गाडेकर माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका आणि विद्यार्थीनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

राहाता शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवताना विशेषतः महिला आणि विद्यार्थिनींचे रोड रोमिओपासून सुरक्षा करण्याचे काम राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक. कैलास वाघ आणि त्यांचे सहकारी पोलीस बांधव चोखपणे करीत असतात आणि म्हणूनच राहाता नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका आणि श्री. साईबाबा सेवा मंडळाच्या सचिव डॉ. सौ. मंगलाताई गाडेकर यांच्या संकल्पनेतून डॉ. के. वाय. गाडेकर माध्यमिक विद्यालयाच्या वतीने राहाता येथील पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले.

यावेळी डॉ. के. वाय गाडेकर पतसंस्थेचे चेअरमन डॉ स्वाधीन गाडेकर म्हणाले की पोलीस बांधव हे नेहमी महिलांच्या रक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतात रक्षाबंधन सारख्या सणाला सुद्धा आपला परिवार आपली बहीण सण उत्सवाला आपल्या सोबत नसले तरी ते कर्तव्य सेवा बजावत असतात या बांधवांना रक्षाबंधनच्या देणे राखी बांधून त्यांना पेढे भरवत सण साजरा करण्याची परंपरा याही वर्षी डॉक्टर के वाय गाडेकर माध्यमिक विद्यालयाने जपली आहे विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या या बांधवांप्रति सद्भावना व्यक्त केल्या आहे.

यावेळी सौ सुशीला राहणे यांनी मनोगत व्यक्त केले. सहा पोलीस निरीक्षक बाबासाहेब सांगळे यांनी आभार मानले.यावेळी मुख्याध्यापक दिलीप शिरसाठ, सौ. सुशीला राहणे,वैभव कुलकर्णी, विजय त्रिभुवन,गणेश पवार, अशोक वाणी, गणेश म्हसे आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!