श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-दुष्काळी परिस्थीमुळे सिंचनाचे आवर्तन करावे तसेच बंधारे व तलाव भरून द्यावेत या मागणीसाठी तालुक्यातील गोंडेगाव येथील गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकर्यांनी सुरू केलेले उपोषण आमदार लहू कानडे यांच्या सूचनेनंतर तसेच जलसंपदाच्या अधिकार्यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
गोदावरी उजव्या कालव्याचे पाणी न मिळाल्यामळे तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे गोंडेगावसाठी सिंचनाचे आवर्तन घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी गोंडेगाव येथील सरपंच सागर बढे, उपसरपंच रवींद्र आमले, सदस्य विजय कासार, सोपान शेलार, प्रदीप जगताप आदिसह गोदावरी कालव्याचे लाभधारक शेतकरी राहाता येथील जलसंपदाच्या उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले होते. याबाबत उपोषणकर्त्यांनी आ. कानडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीमुळे पिके उध्वस्त होऊन निर्माण झालेल्या स्थितीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
आ. कानडे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्याशी संपर्क करत तातडीने आवर्तन सोडण्याच्या व उपोषणार्थींची भेट घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच माजी नगरसेवक अशोक कानडे व प्रमुख कार्यकर्त्यांना यात लक्ष घालण्याबाबत सांगितले. त्यानंतर श्रीमती शहाणे, उपअभियंता अरुण निकम यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी २ सप्टेबरपासून आवर्तन सुरु करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक अशोक कानडे, सतीश बोर्ड यांनी मध्यस्थी केल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. जलसंपदाचे राहाता उपविभागाचे अभियंता महेश गायकवाड, डाव्या कालव्याचे अभियंता तुषार खैरनार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विजय कासार, अनिल कुऱ्हाडे, दिगंबर तांबे, रावसाहेब बढे, विलास कदम, सलिम सय्यद विजय भवार, नवनाथ फोपसे, प्रभाकर फोपसे, रावसाहेब पोखरे, अमोल तांबे, विलास अबक, गोकुळ तांबे, दगडू चौधरी, अशोक थोरात, संजय कदम, धनंजय कदम, सतीश बडधे, आबासाहेब तांबे, नानासाहेब म्हैस, रामभाऊ पिंजारी, मोसिम सय्यद, शरद संसारे, दिलीप चौधरी, राजेद्र योगेश पंडीत, दत्तात्रय धनवटे, अशोक गोरे, अण्णासाहेब रामनाथ चौधरी, मच्छिंद्र चौधरी, दत्तात्रय बढे आदींनी उपोषणास पाठिंबा दर्शविला होता. आ. कानडे यांनी शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची दखल घेतल्याने गोंडेगाव ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करत त्यांचे आभार मानले.



