spot_img
spot_img

कृत्रिम पावसाची कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी-शेतकरी संघटना

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-चीन या देशाप्रमाणेच आपणही पावसाने ओढ दिल्यावर किंवा गरज भासेल तेंव्हा कृत्रिम पाऊस पाडता येईल अशी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशी मागणी

भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात पुढे म्हटले की,महाराष्ट्र राज्य हे भारतातील वाळवंटी प्रांतानंतर सर्वाधिक कमी पर्जन्यमान असलेले राज्य आहे.सर्वाधिक पाऊस पडणा-या ऑगस्ट महिण्यात पावसाने पुर्ण विश्रांती घेतली असुन हि विश्रांती काळजी वाढवणारी आहे.त्यामुळे आपण चीनप्रमाणे पावसाने ओढ दिल्यावर किंवा गरज भासेल तेंव्हा पाऊस पाडता येईल अशी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी कारण दर तीन ते चार वर्षांनी राज्यात दुष्काळी स्थिती उद्भवते.२००३-२००४ मधे तत्कालीन कृषीमंत्री स्व.गोविंदरावजी आदिक व मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी वरिल प्रयोग यशस्वीपणे राबवला होता.त्यावेळी त्याचे कंत्राट एका अमेरिकन कंपनीला CLOUD SEEDING तंत्रज्ञानाने पाऊस पाडण्यासाठी ४.५ कोटी रुपयाला दिले होते. परंतु जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यावर टिका केल्यामुळे सदर प्रकल्प थांबवण्यात आला.

साधारणपणे प्रत्येक तालुक्याचे शेती उत्पादन हे किमान ५०० कोटी रुपयांचे असल्याने शेती उत्पादनात घट आपल्याला परवडणारी नाही. हा प्रयोग केल्यावर आपण शेतकरी आत्महत्या ही काही प्रमाणात थांबवु शकतो. म्हणून तातडीने हा प्रयोग राबवल्यास उर्वरित पावसाळ्यात आपण धरणांमधील पाणीसाठा वाढवु शकतो.पशुधन वाचवु शकतो.यापेक्षा जास्त रक्कम आपण टँकर ने पाणीपुरवठा करण्यासाठी खर्च करत असतो.या सर्व बाबींचा व संभाव्य दुष्काळाचा विचार करुन वरील निर्णय तातडीने राबवावा अशी मागणीही

भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके,जितेंद्र भोसले,भरत आसने,दत्तात्रय लिप्टे,किशोर पाटील ,रवी वाबळे, राजेंद्र भांड,संदीप गवारे,दिलीप गलांडे,जगन्नाथ भोसले,ईश्वर दरंदले,नामदेव येवले, महेश लवांडे, विकास ढोकचौळे,बापुसाहेब सदाफळ आदींनी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!