spot_img
spot_img

प्रा. राजकुमार सरोदे यांना पीएचडी पदवी प्रदान

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):- डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे आयबीएमआरडी कॉलेज अहमदनगर येथील एमसी ए विभागाचे राजकुमार शिवाजी सरोदे यांना कॉम्प्युटर मॅनेजमेंट या विषयामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी प्रदान करण्यात आली.

याबद्दल पद्मश्रींच्या जयंती समारंभात शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते त्यांचासत्कार करण्यात आला. प्रा. सरोदे यांना संशोधन कार्यासाठी जळगाव येथील प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या या यशाबद्दल ना. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, पद्मश्री विखे फौंडेशन, अहमदनगर या संस्थेचे सचिव डॉ. पांडुरंग गायकवाड, संचालक डॉ. अभिजीत दिवटे, उपसंचालक सुनिल कल्हापुरे, संचालक डॉ. संजय धर्माधिकारी आदींनी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!