टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील ओन्ली साई क्रिडा मंडळाच्या कबड्डी खेळाडूंनी संघाचे व गावाचे नाव जगाच्या कानाकोपर्यात पोहचविलेल्या यशस्वी खेळाडूंचा सत्कार ग्रामस्थ व ओन्ली साई क्रिडा मंडळाच्या वतीने करण्यात आला.
टाकळीभान येथील ओन्ली साई क्रिडा कबड्डी मंडळाचे खेळाडू अस्लम इनामदार याने दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून खेळला व भारतीय संघाला गोल्ड मेडल मिळवून दिले. तसेच चीनमध्ये होणाऱ्या १९ व्या आशियाई एशियन गेम्स स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा भारतीय भारतीय संघात निवड त्याची निवड झाली आहे.
शिवम पटारे याची प्रो कबड्डी लीगच्या पर्व १० मध्ये हरियाणा स्टीलर्स संघामध्ये निवड झाली असून के एम पी युवा सिरीज मध्ये अहमदनगर संघाला अजिंक्यपद मिळवून दिले आहे. सौरव मैड याने के एम पी युवा सिरीज मध्ये अहमदनगर संघाला अजिंक्यपद मिळवून दिले आहे. अहमद इनामदार याने के एम पी युवा सिरीज मध्ये ठाणे संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे. प्रसाद गोरे याने के एम पी युवा सिरीज मध्ये अहमदनगर संघाला अजिंक्यपद मिळवून दिले आहे. यश साळवे याने किशोर गट स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळून महाराष्ट्र संघाला ब्राॅझ मेडल मिळवून दिले आहे. अभिजित साळुंके याने शालेय गट १७ वर्षाखालील कबड्डी स्पर्धेमध्ये राज्य पातळीवर गोल्ड मेडल मिळविले आहे या सर्व
यशस्वी खेळाडूंचा तसेच अमोल चितळे, रोहित डुकरे यांची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाल्याबाबद्दल त्यांचा ग्रामस्थ व ओन्ली साई क्रिडा मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत जिमखाना टाकळीभान येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी राहुल पटारे, राजेंद्र कोकणे, कान्हा खंडागळे यांनी मनोगत व्यक्त करून सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, राहुल पटारे, राजेंद्र कोकणे, भाऊसाहेब पवार, मयूर पटारे, सोमनाथ पाबळे, आबासाहेब रणनवरे, विलास सपकळ, माजी कबड्डी खेळाडू अनिल पटारे, किरण धुमाळ, भैय्या पठाण, अलताफ शेख, नूर भाई पठाण, संजय पटारे , बालाजी पटारे, समीर शेंदुरवादे , अजित कदम, प्रकाश गाडेकर ,रवींद्र पवार, गणेश इथापे, वसीम इनामदार, राहुल कोकणे ,सतीश कांगुणे, सुभाष सपकळ प्रशांत कोकणे, मनोज पवार सुरेश गायकवाड, सोमनाथ चितळे ,सनी जाधव, पत्रकार उपस्थित होते.



