लोणी दि.२( जनता आवाज वृत्तसेवा ):-कुस्तीच्या मैदानात डावपेच करून यश जरूर मिळवावे परंतु प्रत्यक्ष जिवनात डावपेच न करता आनंदाने जिवन जगा डावपेच फक्त आणी फक्त खेळातच वापरा असे प्रतिपादन पद्यश्री डाॅ.विखे पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.बी.डी रणपिसे यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी आणि तालुका क्रीडा समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने पदमश्री विखे पाटील महाविद्यालयात तालुका क्रीडा स्पर्धेस मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला जवळ पास ४० विविध विद्यालय आणि महाविद्यालयातून १३५ मल्ल मुले आणि ३२ मल्ल मुली यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी उप प्राचार्य डाॅ.अनिल वाबळे , विभाग प्रमुख प्रा मुढे त्याच प्रमाणे तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष सुनिल आहेर , जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष सुनिल गागरे ,क्रिडा संचालक डाॅ.प्रविण विखे,प्रा. वाणी, डाॅ.उत्तम अनाप , प्रा. चोळके ,प्रा. झुरुळे ,प्रा. दुशिंग ,प्रा. कडसकर,प्रा. सातकर उपस्थित होते . स्पर्धा नियंत्रणाची जबाबदारी प्रा. झुरुळे पार पाडली तर आभार प्रा. दिपक मगर यांनी मानले.



