spot_img
spot_img

आरक्षण प्रश्‍नी  आर पी आय मराठा समाजाच्या पाठीशी-प्रदीप(पप्पू)बनसोडे

राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):-जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या घटनेचा रिपाईचे वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला आहे आरक्षणाचा लढा देणाऱ्या मराठा समाज बांधव भगिनी यांच्यावर लाठी हल्ला करणाऱ्या संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे तातडीने या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी या बांधवांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत तसेच शासनाने तातडीने मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्यासाठी पावले उचलावी अशी मागणी अहमदनगर रिपाई युवकचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे यांनी केले आहे.

या संदर्भात माध्यमांशी संवाद साधताना रिपाईचे युवक अध्यक्ष प्रदीप बनसोडे म्हणाले की रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांनी सर्वात अगोदर मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी आवाज उठवला होता तशी मागणी ही शासन दरबारी नेहमी रिपाईच्या वतीने आठवले साहेब करत असतात मराठा समाज बांधवांना आरक्षण द्यावे ही आमची व आमच्या पक्षाची प्रामाणिक इच्छा आहे मात्र हा प्रश्न प्रलंबित राहतो याचा खेद वाटतो जालना येथे सनदशीर मार्गाने उपोषण करणाऱ्या जरांगे पाटील यांना पाठिंबा असणाऱ्या मराठा समाज बांधवांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज हा मानवतेला धरून नसून अन्यायकारक आहे.

या घटनेचा रिपाई पक्ष व आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध नोंदवतो आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही मराठा समाजाच्या सोबत राहणार असल्याचेही यावेळी प्रदीप बनसोडे यांनी सांगितले या प्रश्नी लवकरच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रिपाईचे शिष्टमंडळ भेटून निवेदन देणार असल्याचेही बनसोडे यांनी सांगितले

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!