वैजापूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- -घर बांधण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या सहा जणांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे ही घटना घडली.
वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील रोहीणी (२८) हिचे लग्न तालुक्यातीलच गाढे पिंपळगाव येथील गोपाळकृष्ण
बद्रीनाथ खोमणे याच्याशी १६ जुन २०२२ साली झाला होते.लग्नानंतर दोनच महिन्यांनी वडील व भावाकडून घर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत यासाठी रोहिणी हिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.तिला मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली.तसे घराबाहेर हाकलून तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.या प्रकरणी रोहिणी हिने दिलेल्या फिर्यादीवरून गोपाळ कृष्ण खोमणे, बद्रीनाथ चांगदेव खोमणे, लताबाई बद्रीनाथ खोमणे, गजानन बद्रीनाथ खोमणे, रुपाली संदीप गंडे व संदीप बाबासाहेब गंडे सर्व रा गाढे पिंपळगाव या सहा जणांविरुद्ध शिवूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पूढील तपास पोलीस नाईक आघाडे हे करीत आहेत.



