वैजापूर( जनता आवाज वृत्तसेवा ): –जिल्ह्याच्या जुनियर व सीनियर गटाच्या मुली व मुलांच्या ज्युदो निवड चाचणी स्पर्धाचे आयोजन संभाजीनगर येथे करण्यात आले होते. त्यामध्ये तालुक्यातील नालेगाव येथील भागीरथी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या जय पठारे याने सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली.
त्याबद्दल त्याची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युदो क्रीडा स्पर्धेकरीता निवड झाली.जिल्हास्तरावर विजयी झालेले सर्व खेळाडू राष्ट्रीय निवड चाचणी करिता पात्र राहतील.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड राष्ट्रीय ज्युदो क्रीडा स्पर्धा करिता होईल. जय पठारे यास राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत गायकवाड, सचिव वाल्मिक सुरासे, प्राचार्य बी. एम. हजारे, संचालक दत्तात्रय सुरासे,प्रमोद एन. पठारे, क्रीडा शिक्षक भरत निंबाळकर, राजेश्वर विभुते, प्रमोद चव्हाण,मनीषा उभेदळ,गंगाधर कटारे,जय पठारे आदींनी अभिनंदन केले आहे.क्रीडा शिक्षक भरत निंबाळकर यांचे त्यास मार्गदर्शन लाभले.



