spot_img
spot_img

महाविकास आघाडीने मंजूर कामाची निविदा निघून सुध्दा काम नाही आमदार – तनपुरे

राहुरी,( जनता आवाज वृत्तसेवा) :- महविकास आघाडीच्या काळातील मंजूर झालेली कामे बंद केली भाजप सरकार ने मुख्यमंत्री योजनेच्या ग्रामसडक रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया होऊन चार महिने उलटले. परंतु गतिमान म्हणविणाऱ्या सरकारने अद्याप कार्यारंभ आदेश दिला नाही. त्याच्या निषेधार्थ रस्त्याच्या लाभार्थी गावात आरडगाव येथे शुक्रवारी दि. ९ तारखेला सकाळी आठ वाजता राहुरी-मांजरी रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

राहुरी येथे पत्रकार परिषदेत माजी मंत्री तनपुरे बोलत होते. तेंव्हा म्हणाले, आमदार निधीतून मोठ्या रस्त्यांच्या कामांना मर्यादा येतात, त्यामुळे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आमदारांना रस्त्यांची कामे सुचविण्याचा अधिकार असतो. महाविकास आघाडी सरकारच्या पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व दुरवस्था झालेल्या रस्त्यांची कामे केली नाही या सरकार ने त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला आहे.

तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले. परंतु, जून २०२२ मध्ये वर्षापूर्वी सरकार बदलले. स्थगिती सरकार आल्याने विकास कामांची गती मंदावली. फेब्रुवारी २०२३ मध्ये रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. ३ मे २०२३ रोजी ई-निविदा प्रसिद्ध झाली. त्यानंतर महिन्यात कार्यारंभ आदेश होऊन कामे सुरू होणे अपेक्षित होते. परंतु चार महिने उलटले. पत्रकार परिषदेत सांगितले. तरी कार्यारंभ आदेश जारी झाले नाहीत. त्यामागे बगलबच्चांना कामे द्यायची, की काही खासगी इंटरेस्ट आहे, अशी शंका आहे.

राहुरी – नगर-पाथर्डी मतदारसंघातील ३४ कोटी ७२ लाखांचे; तर जिल्ह्यातील एकूण १६२ कोटींच्या रस्त्यांची कामे कार्यारंभ आदेशासाठी प्रलंबित आहेत. ही कामे तत्काळ सुरू करावीत, या मागणीसाठी रस्तारोको आंदोलन करणार आहे आणि शासनाचे लक्ष वेधणार आहे, असेही ते म्हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!