spot_img
spot_img

गोदावरी लाभक्षेत्राला पाण्‍याच्‍या आवर्तनाचे आधिका-यांनी समन्‍वय ठेवून सुयोग्‍य नियोजन करावे- पालकमंत्री विखे पाटील, निळवंडे कॅनॉललाही तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना

लोणी दि. ४( जनता आवाज वृत्तसेवा ):- गोदावरी लाभक्षेत्राला पाण्‍याच्‍या आवर्तनाचे आधिका-यांनी समन्‍वय ठेवून सुयोग्‍य नियोजन करावे, आवर्तनाच्‍या काळामध्‍ये असलेल्‍या आदेशाप्रमाणे भारनियमाच्‍या वेळापत्रकाचेही पालन व्‍हावे, उपलब्‍ध पाण्‍याचा अपव्‍यय होणार नाही याची आधिकारी, कर्मचा-यांसह स्‍थानिक कार्यकर्त्‍यांनीही दक्षता घेण्‍याबरोबरच निळवंडे धरणातूनही पाणी सोडण्‍याबाबतचे काटेकोर नियोजन करण्‍याच्‍या सुचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिल्‍या.

गोदावरी आणि प्रवरा धरण समुहाच्‍या आवर्तनाच्‍या नियोजनाचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी नगर, नाशिक येथील जलसंपदा विभागाच्‍या आधिका-यांकडून घेतला. याप्रसंगी नाशिकचे अप्‍पर जिल्‍हाधिकारी राजेंद्र वाघ, जलसंपदा विभागाच्‍या कार्यकारी अभियंता सौ.सोनाली शहाणे, अधिक्षक अभियंता आमले, नगरचे कार्यकारी अभियंता स्‍वप्‍नील काळे, अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक स्‍वाती भोर, नाशिकचे उपविभागीय पोलिस आधिकारी गोकावे, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसिलदार अमोल मोरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता बडगुजर, निळवंडे प्रकल्‍पाचे अभियंता हाफसे उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी गोदावरी आणि प्रवरा धरण समुहातील पाण्‍याचा आढावा घेवून आवर्तनाच्‍या नियोजनाची वस्‍तुस्थिती आधिका-यांकडून जाणून घेतली. पावसाचे प्रमाण कमी असल्‍याने यंदा प्रथमच ऑगस्‍ट, सप्‍टेंबर महिन्‍यातच आपल्‍याला धरणातून सिंचनासाठी आणि पिण्‍यासाठी पाणी देण्‍याची परिस्थिती उद्भवली आहे. त्‍यामुळे उपलब्‍ध पाण्‍यातूनच आपल्‍याला आवर्तनाचे नियोजन सुयोग्‍य पध्‍दतीने करावे लागणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

पिकांना पाणी मिळणे अत्‍यंत गरजेचेच आहे, यासाठी धरण समुहातील शेवटच्‍या शेतक-याला पाणी मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने जलसंपदा विभागाचे नियोजन आवश्‍यक आहे, यासाठी चा-यांमधील अडथळे व्‍यवस्थितपणे दुर करावेत, आवश्‍यक ठिकाणी जेसीबीसह अन्‍य साहित्‍य व मनुष्‍यबळाची मदत डॉ.विखे पाटील सहकार साखर कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध करुन देण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली. वीज वितरण कंपनीच्‍या आधिका-यांनाही भारनियमनाबाबतचे नियोजन चांगल्‍या पध्‍दतीने हाताळावे, शेतक-यांना कुठेही अडचण येणार नाही याची दक्षता घ्‍यावी, बेकायदेशिरपणे पाणी उपसले जाणार नाही याकरीता पोलिस प्रशासनाची मदत घेण्‍याबाबतही त्‍यांनी बैठकीत सुचित केले.

निळवंडे धरणातून सोडण्‍यात येणा-या पाण्‍याचाही आढावा त्‍यांनी घेतला. कालव्‍यातून तातडीने पाणी देण्‍याबाबत नियोजन करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या. मात्र अकोले तालुक्‍यात असलेल्‍या कालव्‍यातील कामांच्‍या त्रृटी दुरुस्‍त करण्‍याचे काम सुरु असल्‍याचे आधिका-यांनी सांगितले. परंतू ही कामे १० दिवसात पूर्ण करुन, पाणी देण्‍याबाबतच्‍या सुचना त्‍यांनी निळवंडे प्रकल्‍पाच्‍या आधिका-यांना दिल्‍या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!