spot_img
spot_img

5 सप्टेंबर पासून काँग्रेसची जनसंवाद यात्रा – आ. लहू कानडे

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :प्रदेश काँग्रेसच्या आवाहनानुसार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ५ ते १२ सप्टेंबर २०२३ या दरम्यान गावात, प्रत्येक वाडी वस्तीवर आणि शहरातील प्रभागात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.

याबाबत पत्रकात आमदार कानडे यांनी म्हटले, की काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ३ हजार ५७० कि. मी. पायी चालत सर्वसामान्य लोकांशी संवाद साधत देश जोडण्याचे काम केले. या यात्रेनंतर प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यात जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात, विधानसभा मतदारसंघात ही यात्रा काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात ५ सप्टेबरपासून या यात्रेस प्रारंभ होणार आहे.

संवाद यात्रेच्या म ध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशाचा उलगडा केला जाणार आहे. यात्रेदरम्यान प्रत्येक गावात कॉर्नर सभा, पदयात्रा, भेटीगाठी याद्वारे काँग्रेस पक्षाचे विचार, ध्येय्यधोरणे गावागावातील जनतेपर्यंत पोहचवून जनतेच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्या सोडण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. राहुरी तालुक्यातील तिळापूरपासून यात्रेला सुरुवात होऊन श्रीरामपूर येथे काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. या यात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. कानडे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!