spot_img
spot_img

छत्रपती अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यासाठी इंडक्शन प्रोग्राम अंतर्गत विविध व्याख्याने यशस्वीरीत्या संपन्न

नगर (जनता आवाज वृत्तसेवा):विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सतत कार्यक्षम असणारे नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यासाठी इंडक्शन प्रोग्राम घेण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी आयोजित या सात दिवसीय कार्यक्रमांमध्ये विविध विषय हाताळण्यात आले. यामध्ये योगा, प्राणायाम यांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन, ऑर्गन डोनेशन, हेल्थ अवेअरनेस, रेड रिबीन क्लब, स्वयंसिद्धा, सायबर क्राईम, रोड सेफ्टी, आय चेकअप, डेंटल चेकअप, हॅप्पीनेस म्हणजे यशाची गुरुकिल्ली, कम्युनिकेशन स्किल, लाइफ स्किल, इत्यादी विषयांवर सविस्तर माहितीसत्रे, व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. 

या विषयांवर माहिती देण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी महाविद्यालयास सदिच्छा भेटी दिल्या. यामध्ये योग गुरु अद्वैताचार्य सुनील गिरी गोस्वामी यांनी योगाभ्यास, पोलीस नाईक अभिजीत अरकल, अरुण सांगळे यांनी सायबर क्राईम विषयी माहिती, डॉक्टर श्री शिवाजी जाधव यांनी हेल्थ अवेअरनेस कॅम्प, डॉक्टर सतीश अहिरे यांनी ऑर्गन डोनेशन विषयी माहिती, आरटीओ डिपार्टमेंट मधून इन्स्पेक्टर सुरज उबाळे यांनी रोड सेफ्टी विषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती, डॉक्टर राजीव चीतगोपीकर यांनी आय चेकअप कॅम्प, प्राध्यापिका एस. एम. वाळके यांनी हॅप्पीनेस म्हणजेच यशाची गुरुकिल्ली, प्रा. अविनाश हंडाळ यांनी विद्यार्थ्यांना स्वयंसिद्धा तर प्रा. गिरीश कुकरेजा यांनी कम्युनिकेशन आणि लाइफ स्कील याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि मार्गदर्शनही केले. विद्यार्थ्यांबरोबर या सत्रांमध्ये बरेचसे मुद्दे सविस्तर चर्चिले गेले. विद्यार्थ्यांना पडलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचे निरसन प्रत्येक व्याख्यानानंतर केले गेले.

इंडक्शन प्रोग्राम चा एक महत्त्वाचा भाग म्हणजेच क्षेत्रभेट. क्षेत्रभेटीसाठी आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक यांनी भेट दिली. हिवरे बाजार गावचे सरपंच माननीय श्री पोपटराव पवार यांनी विद्यार्थ्यांना गावचा इतिहास, येथील पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत केलेली कामे इत्यादींची माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे सर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या विशिष्ट क्षेत्राशी ओळख करून देण्याचा एक महत्वाचा आणि कार्यक्षम मार्ग म्हणून ही आयोजित केलेली व्याख्याने शैक्षणिक क्षेत्रात बहुमोलाची ठरतील असा विश्वास व्यक्त केला.

हा सात दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रथम वर्ष समन्वयक डॉ. एम. के. भोसले, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. गिरीश पाटील यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांना सिव्हील विभागाचे प्रमुख प्रा. पी. जी. निकम, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख प्रा. एस. एम. वाळके, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. जगताप, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. ए. बी. काळे यांनी प्रोत्साहित केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. अक्षय देखणे यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!