spot_img
spot_img

ग्राहक सेवा केंद्र काळाची गरज-महंत रामगिरी महाराज

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):- सध्याच्या धकाधकीच्या युगात ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात नागरिकांना सर्व शासकीय सुविधा तसेच बँकिंग सुविधा आपल्या गावातच मिळणे ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे.

साकुरी येथे बँक ऑफ बडोदा चे ग्राहक सेवा केंद्र,आधार कार्ड सेवा केंद्र,सेतू कार्यालय उदघाटन प्रसंगी रामगिरी महाराज बोलत होते डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत साकुरी येथे बँक ऑफ बडोदा साकुरी शाखा यांचे वतीने ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले या केंद्रा मार्फत नागरिकांना बँकेत जा ये करणे साठी जो वेळ लागतो ती वेळ वाचणार आहे या केंद्रा मध्ये नवीन बँक खाते उघडणे,पैशाची देवाण घेवाण करणे,कर्जा साठी अर्ज करणे,बँकेच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती देणे तसेच,नवीन आधार कार्ड काढणे,आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करणे,विविध प्रकारचे शासकीय दाखले काढणे अश्या या ना अनेक प्रकारच्या सुविधा या केंद्रा मार्फत मिळणार आहे या प्रसंगी या केंद्रा चे संचालक सौ वनिता जाधव,मधुकर महाराज कडलग,अनंत दंडवते,शिवाजी नजन,भागवत लु टे, प्रसाद आहेर,अनिल बावके,गणेश दंडवते,जितेंद्र जाधव,संतोष दंडवते,विलास रोहोम,दिनकर बावके,दादासाहेब कुटे,अरुण बनसोडे, सुरेश बनसोडे,आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!