spot_img
spot_img

राहुरीत दिव्यांगा साठी प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यावतीने रक्षाबंधन उत्साहात

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ): – खास दिव्यांग परिवारासाठी रक्षाबंधना चा कार्यक्रम भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यातील मधुरता वाढवून शक्तिशाली बनवणारे रक्षाबंधनाचा कार्यक्रमा चे आयोजन प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय राहुरी संचालिका नंदा दीदी यांच्यावतीने राहुरी तालुक्यातील दिव्यांगांना रक्षाबंधन कार्यक्रम मार्गदर्शन तसेच स्नेहभोजन चे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा दिव्यांगशक्ती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख महिला तालुकाध्यक्ष छायाताई हारदे उपस्थित होते संस्थेच्या संचालिका नंदादीदी यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केले यामध्ये सर्व मानव जातीला एका प्रेमाच्या बंधनात बांधणारा अस्मियतेचा गोडवा टिकून ठेवण्यात येणारा माणुसकीचा सुगंध, विश्वबंधुताची भावना जपणारा हाच तो पवित्र धागा म्हणजे राखीचा धागा ईश्वरीय कर्तव्याची ईश्वरीय सुंदरतेची ओळख पटवून देणारी हीच ती मंगलवेळ. भाऊबहिणीच्या नात्यातील मधुरता वाढवून शक्तींनी संपन्न जीवन बनवणारी राखी.खास दिव्यांग परिवारासाठी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये योगा मेडिटेशन यांचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच विद्यालयातील दिव्यांग असणाऱ्या कु. छायाताई साठे यांनी आपल्या अनुभव सांगितले. प्रहार दिव्यांग संघटनेचे दादासाहेब मोरे सर तालुका सचिव दत्तात्रय खेमनर संपर्कप्रमुख तालुका समन्वयक नाना महाराज शिंदे कार्याध्यक्ष सुरेश दानवे आदिनाथ महाराज दवणे सचिन साळवे सतीश तरवडे सोमनाथ काळे मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते यावेळी प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयातील सेवेकरी उपस्थिता चे आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!