spot_img
spot_img

राहुरीत मोतीबिंदू निदान व दंत तपासणी संपन्न

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ): – महिन्याच्या पहिल्या रविवारी होत असलेल्या आनंदऋषीजी नेत्रालय अ.नगर व राम रामेश्वर फाउंडेशन तसेच दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी राम डेंटल क्लिनिक राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र मोतीबिंदू निदान व दंत तपासणी शिबिर अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन श्री संत गाडगेबाबा आश्रम शाळा राहुरी या ठिकाणी करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय राहुरी संचालिका नंदा दीदी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष कहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख हे होते यावेळी प्रमुख उपस्थिती दादासाहेब मोरे सर सौ लीना हिरण दीदी डॉ.शेलार मॅडम डॉक्टर महेश इघे, तालुकाध्यक्ष योगेश लबडे तालुका सचिव दत्तात्रय खेमनार तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी शाखाध्यक्ष चेडगाव सतीश तरवडे शाखा उपाध्यक्ष वांबोरी सोमनाथ काळे होते प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले.

यामध्ये हे शिबिर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी घेण्यात येत आहे आज पर्यंत 82 यशस्वी शिबिर पार पडले आज पर्यंत ४७६० पेशंट वर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली सामाजिक कार्याची आवड असल्याने हे असे शिबिर घेण्यात येत आहे तरी राहुरी तालुका येथील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा डॉ सचिन शेलार यांनी नेत्र तपासणी शस्त्रक्रिया झाल्यानंतर घ्यायची काळजी सूचना आणि मार्गदर्शन केले

प्रजापिता ईश्वरनीय विश्वविद्यालय राहुरी संचालिका नंदा दीदी हे शिबिराचा उद्देश म्हणजे फक्त ज्येष्ठ नागरिकांची सेवा आहे आयोजन करणाऱ्या संस्थेच्या कोणताही स्वार्थ नाही उदांत सेवेतूनही काम चालू असते अशा शब्दात कौतुक करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने पेशंट उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार ह. भ. प. आदिनाथ दवणे महाराज यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!