spot_img
spot_img

मराठा आरक्षणावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ खोकर फाटा येथे रस्ता रोको, सर्वधर्मीयांचा सहभाग

माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आक्रोश मोर्चावर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने खोकर फाटा येथे श्रीरामपूर नेवासा राज्य मार्गावर मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या रास्ता रोकोला मराठा समाजाबरोबरच सर्व जाती धर्माच्या सर्व धर्मीय नागरिकांनी उपस्थित राहून या रस्तारोकोत सहभाग नोंदवला व मराठा समाजाला आपला पाठिंबा जाहीर केला.

यावेळी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अंतरावली सराटी येथील लाठी चार्ज प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, शेतीला उच्च दाबाने वीजपुरवठा करावा, श्रीरामपूर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ वर्ग करा यासह आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे.

सदर निवेदन मंडळ अधिकारी प्रशांत ओहोळ, श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व कामगार तलाठी राजेश घोरपडे यांनी स्वीकारले .यावेळी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी माळवाडगाव,मुठेवडगाव ,खानापूर,भामठाण,खोकर,भोकर,कमलपूर, पंचक्रोशीतील सर्व धर्मीय समाज उपस्थित होता.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!