spot_img
spot_img

जालना लाठीचार्ज निषेधार्थ हसनापूर कडकडीत बंद

लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा निषेध व्यक्त करीत राहाता तालुक्यातील हसनापूर येथील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळण्यात आला.

अंतरवाली सराटी येथे सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचाराचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोर्चे, बंद, निषेध सभा होत असताना राहाता तालुक्यातील हसनापूर येथील सर्वधर्मीय ग्रामस्थांनी दुकाने व व्यवहार बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला. सकल मराठा समाज व स्थानिक नागरिकांनी केलेल्या आव्हानाला सर्व समाजाने पाठिंबा देत शंभर टक्के बंद पाळला. झालेली घटना माणुसकीला, लोकशाहीला आणि अहिंसा तत्वाला काळिमा फासणारी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!