spot_img
spot_img

राहाता तालुका शालेय कबड्डी स्पर्धेस सैनिक स्कुल लोणी येथे मोठ्या प्रारंभ

लोणी दि.६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-

जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने पदमश्री विखे पाटील सैनिक स्कुल लोणी येथे शालेय तालुका कबड्डी स्पर्धेस मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला जवळ पास ४५ विविध विद्यालयातून मुले व मुली मिळून एकुण ५४० खेळाडूनी सहभाग नोंदविला.

यावेळी सैनिक स्कुल चे प्राचार्य गाढवे उपस्थित होते.तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रा. सुनिल आहेर, जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनिल गागरे , प्रवरा पत संस्थेच्या चेअरमन सौ विद्या गाढे,संस्थेचे क्रिडा संचालक डाॅ.प्रमोद विखे, प्रा. वाणी, प्रा उत्तम अनाप , प्रा.सुनिल चोळके,प्रा. झुरुळे,प्रा. दुशिंग,प्रा. कडसकर,प्रा. घोलप,प्रा. अनिल चिधें ,प्रा. दादा तुपे उपस्थित होते.स्पर्धा नियंत्रणाची जबाबदारी प्रा. बाबा वाणी पार पाडली तर आभार प्रा. प्रतिक दळे मानले .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!