राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहुरी नगरपालिका हद्दीतील विविध प्रभागातील विकास कामांकरिता सुमारे सात कोटी 38 लाख 30 हजार 238 रुपयांचा निधी पालिकेत प्राप्त झाला असल्याने विकास कामांचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की ,पालिकेची सर्वसाधारण बैठक दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी घेण्यात आली होती त्यात विविध प्रभागातील विकास कामांचा समावेश असलेला प्रस्ताव शासनास सादर केला होता शासनाने मंजुरीही दिलेली होती.
नंतर राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्वच विकास कामांना स्थगिती देण्यात आलेली होती या स्थगिती संदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून निधी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार पालिकेने सादर केलेल्या प्रस्तावातील 7 कोटी 38 लाख 30 हजार 238 इतकी रक्कम प्राप्त झाली आहे.
यात प्रामुख्याने डुबीचा मळा येथील गायकवाड घर ते बोरकर घर बंदिस्त गटार व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,विद्यामंदिर शाळेजवळील शिवाजी चौक बोळीचे काँक्रिटीकरण ,वैजनाथ मंदिर परिसरातील काँक्रिटीकरण , प्रभाग क्रमांक पाच मधील आरसीसी पाईप गटार व रस्ता कॉंक्रिटीकरण , महात्मा फुले चौक ते नवनाथ डेअरी रस्ता मजबुतीकरण खडीकरण व डांबरीकरण, पांडूरंग नगर अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण डांबरीकरण व सुशोभीकरण, प्रभाग क्रमांक चार व पाच व सहा मधील विविध ठिकाणी जी आय पोल बसविणे, गोरख तांबोळी घर ते आतार घर काँक्रिटीकरण, मल्हारवाडी रोड ते नांदे वस्ती खडीकरण व डांबरीकरण, बापूसाहेब तनपुरे वस्ती ते काळे आखाडा रोड व भिंगारकर वस्ती पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण, नगर मनमाड रस्ता ते जिजाऊ नगर रस्ता खडीकरण व डांबरीकरण, ढेरेवाडी परिसर रस्ते कॉंक्रिटीकरण, सखाहरी तनपुरे वसाहतीतील रस्ते खडीकरण, विलास तनपुरे घर ते खाबीया घर साईनगर मधील रस्ता खडीकरण ,घोरपडे हॉस्पिटल ते दारूवाला अपार्टमेंट रस्ता कॉंक्रिटीकरण, शिव अंबिका किराणा सोनवणे घर रस्ता कॉंक्रिटीकरण, मल्हारवाडी रोड ते सुनील पानकर घर इंगळे इस्टेट मधील रस्ता काँक्रिटीकरण करणे ,केटी वेअर ते नांदूर रोड रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, नांदूर रोड ते परदेशी घर रस्ता कॉंकीटीकरण ,सोमनाथ पोपळघट जमीन ते काळे आखाडा चारी पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण, ग्लोबल स्कूल ते काळे आखाडा रस्ता डांबरीकरण ,सुभाष गुंजाळ घर ते सुरेश पवार घरापर्यंत आरसीसी पाईप गटार, रघुनाथ शेटे घर ते भाऊसाहेब नेहे घर आरसीसी पाईप गटार , येवले आखाडा येथील अमरधाम पर्यंत रस्ता डांबरीकरण ,इरिगेशन कॉलनी ते जाधव वस्ती येवले आखाडा रोड खडीकरण डांबरीकरण ,आकाश हॉटेल ते लगे व मोढे वस्तीपर्यंत रस्ता खडीकरण, जोगेश्वरी आखाडा येथील नगर मनमाड हायवे ते मोहटा देवी पर्यंत डांबरीकरण ,राहुरी महाविद्यालय समोरील वसाहतीत बंदिस्त गटार करणे, अग्रवाल घर ते तनपुरे कॉम्प्लेक्स रस्ता डांबरीकरण व कॉम्प्लेक्स मधील रस्ता काँक्रिटीकरण अशा कामांचा समावेश असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले
नगरपालिका हद्दीतील सर्वच प्रभागात यापूर्वीही विविध विकास कामे केलेली आहेत वाढते शहरीकरण व वसाहती यामुळे विकासाची व्याप्तीही लक्षात घेऊन नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेऊन विकासाचा समतोल साधला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले