3.1 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

आढाळा धरणातून उद्याच आवर्तन सोडा- ना. विखे पाटील 

लोणी दि.७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-अकोले तालुक्यातील आढळा मध्यम प्रकल्पामध्ये सद्यस्थितीस 1004 (94%) दलघफ़ु इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. दिनांक ६सप्टेबर 2023 पर्यंत आढळा प्रकल्पाच्या उजवा व डावा कालवा मिळुन 350 हेक्टर क्षेत्राची मागणी प्राप्त झाली होती, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतक-यांनी शेतीसाठी आवर्तनाची केलेली मागणी विचारात घेवून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 22/08/2023 रोजीच्या पत्रानुसार मा. पालकमंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिस्थिती समजावून घेत टंचाई परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्या दिनांक 07/09/2023 रोजी खरीप आवर्तन सोडण्याचे आदेश अहमदनगर पाटबंधारे विभागास दिले आहेत. त्यानुसार आवर्तन सोडण्यात येणार असून, सदर आवर्तनामुळे संगमनेर व अकोले तालुक्यातील 13 गावांमधील पिकांना फ़ायदा होणार असुन लाभक्षेत्रातील शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!