5.8 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

शिवांकुर विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):शिवांकुर विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षक हे समाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे ते सुसंस्कृतिक पिढी घडवण्याचे काम करतात. असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी केले

5 सप्टेंबर म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.

शिक्षक दिनानिमित्त विद्यालयात इयत्ता दहावीचे विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका घेऊन दिवसभर अध्यापन केले. संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रिय गुरुजनांविषयी आपले ऋण व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त उत्स्फूर्तपणे भाषणे केली.

विद्यालयाच्या शिक्षिका प्रियंका पांढरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. या शिक्षक दिनाचा सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आनंद घेतला. या शिक्षक दिनानिमित्त विद्यालयात मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून शिक्षकांसाठी संगीत खुर्ची या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधून मुख्याध्यापक कु.अथर्व माने व पर्यवेक्षक म्हणून वैभव सागर यांनी विद्यालयात काम पाहिले.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, विश्वस्त भास्कर पवार, उत्तमराव पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार, खजिनदार डॉ. किशोर पवार, सौ मंगल ताई पवार, युवराज पवार ज्योतीताई शेळके, यांची उपस्थिती लाभली. . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर धुमाळ व आभार किरण तारडे यांनी केले.

या कार्यक्रमास शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सुनील लोळगे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, पल्लवी भालदंड व लिपिक, अर्चना पाळंदे शिपाई शारदा तमनर, सिद्धेश्वर भोईटे,आदींसह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!