श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- केंद्र व राज्य सरकार विकासाच्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यांचे ढोंग व पितळ उघडे पडायला लागले आहे. त्यामुळे मणिपूर व अंतरवली सराटीसारख्या घटना घडवून आणल्या जात आहेत. जनतेची दिशाभूल करून मुळ प्रश्नाला बगल देण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेने याचा विचार करून अशा गोष्टीना थारा देऊ नये, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी जनसंवाद यात्रे दरम्यान आयोजित बैठकीत केले.
आ. कानडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेस राहुरी तालुक्यातील तिळापूर व वांजुळपोई या गावातून प्रारंभ झाला. यावेळी जनतेशी संवाद करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राखमाजी जाधव, नानासाहेब रेवाळे, सरपंच बापूसाहेब आघाव, सरपंच डॉ. साळुंके, एकनाथ पवार, डॉ. सचिन पवार उपस्थित होते.
आ कानडे म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी कायदा आणला. त्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यावेळी अनेक शेतकरी मेले. त्यानंतर हा कायदा रद्द करण्यात आला. आता अदानीला विमानतळ, बंदरे, रेल्वे विकण्यात येत आहे. एकाच व्यक्तीला हे विकण्याची गरज काय आहे. म्हणजेच यात काही तरी काळे बेरे असण्याची शक्यता आहे. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणक युग आणले. त्यानंतर माध्यमांची क्रांती झाली. काँग्रेसच्या काळात 40 हजार कोटीचे देशावर कर्ज होते आता ते 158 लाख कोटींवर गेल्याचे ते म्हणाले.
आपण हागणदारीमुक्त गाव ही चळवळ उभी केली. राज्याने ही योजना सुरू केली. गेल्या चार वर्षात मतदारसंघातील 90 टक्के प्रमुख रस्त्यांची कामे झाली, उर्वरित रस्त्यांची कामे पूर्ण होतील. सर्व शाळा डिजिटल केल्या. गावोगाव व्यायामाचे साहित्य दिले. विकासाचा डोंगर उभा केला. तरुणांसाठी नोकरी मेळावा घेऊन 1170 तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. अतिवृष्टीच्या मदतीसाठी आंदोलन केल्याने मदत मिळाली. आता विम्याच्या 25 टक्के अग्रीम मदतीत श्रीरामपूरातील सर्व मंडळे तसेच देवळाली व टाकळीमिया ही मंडळे बसली आहेत. सध्या अनेक गावात जलजीवन पाणी योजनांची कामे सुरू आहेत, जलजीवन मिशनऐवजी दुसरेच मिशन सुरू असल्याचे आ. कानडे म्हणाले.
यात्रेदरम्यान आ. कानडे यांनी गावातील नागरिकाचे प्रश्न जणून घेतले. आ. कानडे यांनी दलित वस्तीत जाऊन महिलांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी रेशनकार्ड, घरकुल, डोल, जातीचे दाखले या सुविधा मिळत नसल्याचे सांगितले. याबाबत गावात ग्रामसभा घेऊन तसेच सर्व्हे करून प्रश्न सोडविण्याच्या सूचना ग्रामसेवकास दिल्या. यावेळी सुनीता गायकवाड, मंदा खरात, आशा अवसरमल, सरस्वती जाधव, बापू कोळेकर, संजय भाकरे, प्रकाश वाघमारे यांनी प्रश्न मांडले.
तिळापूर गावातील गावठाण डीपी बंद असल्याने 15 दिवसांपासून गावात पाणी नाही, असे ग्रामस्थांनी सांगताच आ. कानडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर त्वरित वीज पुरवठा सुरू करण्यात आला. वांजुळपोई सबस्टेशन मंजूर झाल्याने या भागातील वीज पुरवठा सुरळीत होईल, असेही ते म्हणाले. वांजुळपोई येथे प्रवरा नदीवरील बंधार्याचे कठडे अनेक ठिकाणी तुटलेले आढळून आल्याने आ. कानडे यांनी संबंधित अधिकार्याशी संपर्क करत तातडीने कठडे बसविण्याच्या सूचना केल्या. सध्याची दुष्काळी परिस्थिती व त्यावरील उपाययोजना यासंबंधी त्यांनी शेतकर्यांशी चर्चा केली.
यावेळी एकनाथ पवार, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब जाधव, नानासाहेब जाधव, पोपट पवार, पप्पू पवार, अप्पासाहेब गुरसाळ, अप्पासाहेब पवार, श्रीरंग पवार, एकनाथ सीताराम पवार, कोंडीराम विटनोर, योगेश पवार, बाबासाहेब काकड, बापूसाहेब आघाव, रविंद्र पवार, बाबासाहेब वाघमोडे, दत्तात्रय पवार, दौलत पवार, काशिनाथ जाधव, चंद्रभान होन, राजेंद्र पवार, बाळासाहेब डोंगरे, विष्णू ठोसर, गंगाधर जाधव, किशोर पवार, कचरू तागड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.