श्रीरामपुर ( जनता आवाज वृत्तसेवा):- गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या वतीने देण्यात येणारा आनंदाचा शिधा श्रीरामपुर तालुक्यात पोहोच झाला आहे .तालुक्यातील ११० धान्य दुकानामधुन त्याचे वितरणही सुरु करण्यात आले असुन कार्डधाराकांनी शंभर रुपयात हा शिधा आपल्या जवळील दुकानातुन घेवुन जावा असे अवाहन तहसीलदार मिलींद वाघ यांनी केले आहे.
श्रीरामपुर तालुक्यातील कार्डधारकासाठी आनंदाचा शिधा तालुक्यास प्राप्त झाला असुन त्याचे वितरण तहसीलदार मिलींद वाघ यांच्या हस्ते व अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी गोदामपाल मिलींद नवगीरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्या वेळी बोलताना तहसीलदार वाघ म्हणाले की श्रीरामपुर तालुक्यात एकुण कार्डधारकांची ३७५०० संख्या असुन दुकाननिहाय आनंदाचा शिधा वितरण सुरु करण्यात आले आहे. तीन दिवसात तालुक्यातील जवळपास सर्वच दुकानात आनंदाचा शिधा पोहोच झालेला असेल त्यामुळे अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना शंभर रुपयात एक किलो साखर, एक किलो चना डाळ, एक किलो पामतेल, एक किलो रवा या वस्तू देण्यात येणार आहे .
अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यांना आनंदाचा शिधा न मिळाल्यास श्रीरामपुर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन तहसीलदार वाघ यांनी केले आहे या वेळी माणिक जाधव चंद्रकांत गायकवाड संजय चंदन बबन गोरे बाळासाहेब वाघमारे संतोष नन्नवरे लक्ष्मण खरात प्रविण आजगे गोपीनाथ मगर दिलीप शेंडे शिवाजी वाणी अनिल गोरे गणेश गोरे रौप शेख अकील शेख आदि उपस्थित होते