राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहूरी तालुक्यातील म्हैसगांव मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण होत चालले आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे त्यांचे त्या दुकानदाराशी काय लागे बांधे याकडे कारवाई होईल की नाही असे सर्वांचे लक्ष लागले आहे याचे कारण मात्र स्पष्ट होत नाही .
म्हैसगाव मध्ये नव्याने सार्वजनिक बांधकाम विभागने गावत असलेल्या रस्त्यावर मोठा निधीखर्च करून सिमेंट (कॉंक्रिटीकरण ) वापर करूण रस्ता बनवण्यात आला आहे परंतु त्याच रस्त्यावर नवीन दुकाने तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे याकडे जाणून बुजून सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग यांनी दोन्हीही सरकारी यंत्रणे जाणून बुजून दुर्लक्ष चालवले आहे या मुळे हा रस्ता गावातील व रस्त्याने चालणाऱ्या लोकांना धोकादायक ठरू शकतो हे दुकान बंद झाले नाही याचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांना भोगावा लागणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी चर्चा चालू आहे या कडे ग्राम पंचायत ने पण दुर लक्ष केले आहे कारण या ग्राम पंचायतचे नव्याने मतदान होणार आहे त्या मुळे की काय असे अनेक प्रश्न निर्मीण झाले आहे परंतु ग्राम सेवक प्रशासकीय अधिकारी यांनी तरी लक्ष दिले पाहिजे .
१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी वन विभागातील झेंड्याला वंदन करण्यासाठी शाळेचे विद्यार्थी मुलं मुली गावातील ग्रामस्थ सरपंच उसरपंच तलाठी वन कर्मचारी यांना वंदन करण्यासाठी जागा व जाण्यासाठी मार्ग राहिला नाही याच दुकानांपासून या मार्गाने दुःखी नी निधन झालेल्या व्यक्तीला अंत्यविधीसाठी मशानभूमीत घेऊन जाताना हे दुकाने आडवे येतात या विधी साठी मोठ्या प्रमाण ग्रामस्थ असतात परंतु या विधी करताना सर्व ग्रामस्था मोठी तकलीप होते . त्याच दुकानाच्या बाजुला ग्रामपंचायत ने मुतारी तयार केली होती परंतु आत्ता त्या ठिकाणी दुकान चालू होणार आहे त्यामुळे पुरुषांना किंवा महिलांना त्या ठिकाणी जाता येत नाही असे दिसत आहे या दुकानाला खेटून महिलांची व पुरुषांची मुतारी पण बंद झाली आहे ग्रामस्थ या कामासाठी दुकाणे बंद करू शकत नाही त्यालाच खेटून मुतारी बांधलेली बंद झाल्यासारखे दिसते आहे
या सर्व दुकानदारावर कोणत्या राजकीय नेत्याचा हात आहे याकडे सर्व गावाचे व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे तरी दुकानावर सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग यांनी लवकर लवकर कारवाई करण्यात यावे .
या दुकानांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चालवले आहे याबद्दल ग्रामपंचायत शी पत्रव्यवहार व तोंडी बोलणे केले आहे परंतु अद्याप ग्रामपंचायत ने कुठलीही कारवाई केली नाही .
गोडकर साहेब (वनरक्षक म्हैसगाव )