श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- मागील काही दिवसापूर्वी राहूरी येथे, बहुजन वंचित चे प्रकाश अंबेडकर व अनेक पदाधिकरी यांची सभा झाली, सदर सभेमध्ये जो बॅनर लावला गेला होता. त्यात टिपू सुलतान याच्या सोबत, महाराष्ट्रातील अनेक महापूराषाचें फ़ोटो लावल्या मुळे…दोषीवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून श्रीरामपुर येथे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना आज ६ सप्टें रोज़ी,मराठा, बौध,माळी,आदिवासी,मातंग,धनगर तसेच भिल्ल समाजा च्या वतीने निवेदन देण्यात आले.
काही दिवसा पूर्वी सकल हिंदू समाज,च्या वतीने राहूरी येथे जनआक्रोश मोर्चा झाला.राहूरी येथील उंबरे गावामाधिल एक मुस्लिम शिक्षेके कडुन काही हिंदू मूलींना धर्मातरंनास बळी पाड़ल्या प्रकारणी, मोर्चा झाला ज्या मधे, आमदार नितेश राणे, सागर बेग, तसेच संत तुकाराम महाराज यांचे, वांशज शिरीष महाराज मोरे यांचा प्रमुख सहभाग होता.या मधे लवजिहाद, त्याच बरोबर अनेक ज्वलंत मुद्दयावर खड़ाजंगी भाषणे झाली.
याच धरती वर प्रतिउत्तर म्हणून ॲड .प्रकाश अंबेडकर याची सभा झाली अशी चर्चा आहे.या सभे मधे स्टेज वर जो बॅनर लावला गेला त्यात टिपूसुलतान याच्या फ़ोटो सोबत…शिवाजी महाराज, तसेच डॉ.बाबासाहेब अंबेडकर ईं. महापूराषाचे फ़ोटो लाऊन , व यात काही भाषणा मुळे , तसेच एक मौलाना यांचा असभ्य व चिथावणी खोर व्यक्तव्य केल्या प्रकरनी सामाजिक भावना दुखावल्या गेल्या या कामी, आज ६ सप्टे रोज़ी, श्रीरामपुर येथे अप्पर अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्या कामी सर्व सामाजातिल पदाधिकारी उपस्थित होते, या ठिकानी पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांनी स्वीकाले, भोर मैडम च्या वतीने निवेदन स्विकारले.या वेळी बौध समजाचे अनेक धर्मगुरु भन्ते जी, राष्ट्रीय श्रीराम संघ चे सागर बेग,मातंग समजाचे अध्यक्ष बंटी अड़ांगळे,माळी समाजाचे सतीश अत्रे,एकलव्य भिल्ल समजाच्या वतीने संदीप गांगुर्डे, श्रावण गांगुर्डे, संदीप लांडे मंगेश चव्हाण संकेत चव्हाण ई.पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते