कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोपरगाव मतदार संघाला ४० वर्ष सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी लाभलेले असतांना तालुक्यातील विकासाचे प्रश्न शिल्लक राहीला नको होते. मात्र दुर्दैवाने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. मात्र चार वर्षात वारी व परिसराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावतांना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना चाळीस वर्षात जे प्रश्न सोडविता आले नाही ते प्रश्न सोडवून दाखविले असून सत्ताधारी पक्षाचा आमदार काय करू शकतो हे मतदार संघातील जनतेने अडीच वर्षात पाहिले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील वारी येथे २१ कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथे २० कोटी निधीतून मागील पाच दशकापासून प्रलंबित असलेल्या गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम करणे, ३० लक्ष रुपये निधीतून वारी ते डोणगाव शिवरस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व २० लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या वारी ते तालुका हद्द रस्त्यावरील पुल, ५०.५८ लक्ष रुपये निधीतून वारी सब स्टेशन येथे बसवण्यात आलेला नवीन ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर व १० लक्ष रुपये निधीतून बसवण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव कोकाटे होते.
ते पुढे म्हणाले की,माजी आमदार अशोकराव काळे यांनी १० वर्ष विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील मतदार संघातील प्रलंबित असलेले विकासाचे प्रश्न सोडवीले. यामध्ये गोदावरी नदीवरील अनेक पूल, शासकीय इमारती, प्रमुख रस्ते आदी महत्वाची विकास कामे पूर्ण करून दाखविली. मला दिलेल्या संधीतून आतापर्यंत ४ वर्षात वारी गावात जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार निधीतून ५५ कोटी रुपये निधी दिला आहे. आतापर्यंत एवढा निधी वारी गावास कधीच मिळाला नाही. तुम्ही २०१९ च्या निवडणुकीत सधी दिली त्या संधीतून तुमच्या परिसराचे जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडविता येतील यासाठी प्रमाणिक प्रयत्न केले. सुरुवातीला विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करावे लागेल असे वाटले होते परंतु घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे सत्ताधारी पक्षाचा आमदार झालो आणि अडीच वर्षात वारी व परिसरातील रस्ते,वीज, पाणी आदी मुलभूत प्रश्न सोडविले. एक वर्ष विरोधी पक्षाचा देखील आमदार होतो मात्र निधी आणण्यात मला अडचण आली नाही. परंतु पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाचा आमदार झालो आणि मतदार संघाच्या विकास कामांना जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी पाठपुरावा करीत आहे. वारी गाव व परिसरातून तुम्ही विधानसभेला लीड देणार आहेतच परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा व याची सुरुवात वारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून सुरु करा असे आवाहन करून तुमचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही अशी ग्वाही आशुतोष काळे यानी यावेळी दिली.यावेळी माजी सरपंचांसह अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला.यामध्ये माजी सरपंच बद्रीनाथजी जाधव, वारी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन वाल्मिक जाधव, विजयसिंह गायकवाड, धोंडीराम हिवरे, भीमा आहेर, राजेन्द्र टिक्कल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, संचालक सुधाकर रोहोम, दिलीप बोरनारे, सुरेश जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य मधुकर टेके, सोमैय्या ऑरगॅनो केमिकल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर सुहास गोडगे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, संचालक भाऊसाहेब भवर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगर, मजूर फेडरेशनचे संचालक विजयराव गायकवाड, मुरलीधर थोरात, नामदेवराव जाधव, विक्रम सीनगर, रावसाहेब टेके, संदीप जाधव, संदीप लांडगे, महेश टेके, मनोज वरकड, नामदेव गुंजाळ, एम.टी. टेके, अशोक कानडे, गोरख टेके, भगवान पठारे, दिलीप देशमुख, अशोक बोराडे, भास्करराव आदमाने, रमेश कोकाटे, राहुल कोकाटे, दिलीप टेके, गोपाल कारवा, रियाज शेख, गोरख लांडगे, संजय चौघुले, विजय गायकवाड, बदीनाथ जाधव, सचिन टेके, राजेन्द्र गांगड, तानाजी थरमिशे, गौतम दोशी, नानासाहेब टेके, दीपक संत, सागर टेके, गणेश टेके, रामेश्वर जाधव, विठ्ठलराव जाधव, शांताराम जाधव, प्रताप वाईकर, वाल्मिक जाधव, बंटी शेळके, वाल्मिक गुंजाळ, धोंडीराम हिवरे, गोरख पंडोरे, राजेंद्र गायकवाड, सुधाकर ठोंबरे, अप्पासाहेब मलिक, सुमित नेवगे, शिवराज जाधव, तुषार वरकड, गणेश जाधव, देवचंद कडेकर, बबनराव सांगळे, दिनकर काजळे, रंगनाथ काजळे, अॅड. काजळे, बाबासाहेब कडेकर, दिपक भाकरे, रमेश काळे, भाऊसाहेब करडे, रावसाहेब करडे, किसन सांगळे, भाऊसाहेब जाधव, पद्माकर सुराळकर, बाळासाहेब बाभूळके, ज्ञानदेव चौधरी, भाऊसाहेब जाधव, संदीप काळवाघे, बाळासाहेब बाभूळके, पोपट चौधरी, मच्छिंद्र काळवाघे, दत्तात्रय जाधव, जनार्दन बर्गे, रवींद्र भालेराव, कारभारी नरोडे, बबनराव ठोंबरे, मीननाथ चौधरी, विलास वाडगे, अशोक साळुंके, बाळासाहेब पवार, सीताराम पगारे,गणेश बारहाते, अनिल बारहाते, रमेश वाकचौरे, शशी बारहाते, महेश बारहाते, संतोष बारहाते, माणिक बारहाते, विजय बारहाते, रावसाहेब बारहाते,वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कदम, पंचायत समिती उपअभियंता दळवी, शाखा अभियंता गुंजाळ, प्रशासक बाळासाहेब साबळे, विस्तार अधिकारी वाघमोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिंदे, जय श्रीराम ग्रुप, जय बजरंग ग्रुप, राजे प्रतिष्ठाण, तुळजा भवानी मित्र मंडळाचे सदस्य, आदींसह वारी, कान्हेगाव, सडे, शिंगवे, भोजडे, डोणगाव, बापतारा आदी गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे मोठे समाधान
वारी पुलाचा प्रश्न मागील पाच दशकापासून प्रलंबित होता हा फुल व्हावा यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील प्रयत्न केले होते. हा पूल व्हावा हे त्यांचे स्वप्न होते या पूलामुळे वारीसह परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार असून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या स्वप्नांची पूर्तता व विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे मोठे समाधान मिळत आहे.- आ.आशुतोष काळे.