कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- बालगोकुलम अकॅडमी , कोल्हार बुद्रुक या इंग्रजी माध्यमातील शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपालकाला खूप आनंदात उत्साहात बालगोपालांनी, शिक्षकांनी, पालक वर्ग यांनी साजरा केला .
प्रारंभी बाल श्रीकृष्ण यांचे प्रतिमापूजन व आरती प्रमुख पाहुणे श्री शिवाजी उदावंत सर व पालक प्रतिनिधी निलेश मोहोडकर यांच्या हस्ते करण्यात आले , उपस्थितांसमोर बोलताना प्रमुख पाहुण्यांनी श्रीकृष्णाच्या लीला, गवळणीच्या घागरी फोडणे,कालिया मर्दन, कंस वध असे उदाहरण देवून या लीला आपल्या जीवनात कशा प्रेरक व मार्गदर्शक आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने चिमूरड्या विद्यार्थ्यांसमोर मांडले. दूध ,दही लोणी खावून सर्व बालगोपालांनी शारीरिक.मानसिक, बौद्धिक रित्या सुदृढ होऊन येणाऱ्या संकटाला श्री कृष्णा प्रमाणे सामोरे जावे आणि मोठेपणी कर्तुत्ववान व्हावे , अशा शुभेच्छा दिल्या.बासरी, डोक्यावर मोरपीस असा पेहराव केलेले बालक , श्रीकृष्ण बनून व घागरा चोळी परिधान करून बालिका राधेच्या यांच्या वेशभूषेत विविध नृत्य ,श्रीकृष्ण जन्मप्रसंग, सुदामा भेट या नाटिकाचे सादरीकरण केले. शेवटी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम एकदम जल्लोषात ..हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की ….या जय घोषात फोडण्यात आली .एकूणच सर्व शाळेतील वातावरण भक्तिमय, भावमय व चैतन्यमय असे होऊन गेले.