कोपरगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):- यंदा पावसाअभावी कोपरगाव तालुक्यासह महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. पीकपाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून पर्जन्य महायज्ञ करण्यात आला. या पर्जन्य महायज्ञामुळे वरुणराजा प्रसन्न झाला असून, पावसाला सुरुवात झाल्याने सध्याची दुष्काळी परिस्थिती लवकरच बदलेल, असा विश्वास राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरीजी महाराज यांनी व्यक्त केला. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात मुबलक पाऊस पडू दे, दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, बळीराजा व जनता सुखी होऊ दे, अशी प्रार्थना माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी श्री विघ्नेश्वरचरणी केली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, कष्टकरी शेतकरी, व्यापाऱ्यांसह सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. दुष्काळाचे संकट टळण्यासाठी व चांगला पाऊस पडावा म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर मंदिरात पर्जन्य महायज्ञ करण्यात आला. या महायज्ञाची पूर्णाहुती राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरीजी महाराज, प.पू. राघवेश्वरानंदगिरीजी ऊर्फ उंडे महाराज, महामंडलेश्वर श्रीश्री १००८ प. पू. शारदानंदगिरी माताजी, प.पू. कैलासानंदगिरीजी महाराज, प.पू. गोवर्धनगिरीजी महाराज या संत, महंतांच्या हस्ते व माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी झाली.
यंदा कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानने पर्जन्य महायज्ञ आयोजित केला. या पर्जन्य महायज्ञाची सांगता होत असताना कोपरगाव व परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे सांगून प.पू. रमेशगिरीजी महाराज, प.पू. राघवेश्वरानंदगिरीजी ऊर्फ उंडे महाराज, महामंडलेश्वर श्रीश्री १००८ प. पू. शारदानंदगिरी माताजी, प.पू. कैलासानंदगिरीजी महाराज, प.पू. गोवर्धनगिरीजी महाराज व माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी विवेकभैय्या कोल्हे व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांचे कौतुक केले.
या पर्जन्य महायज्ञ सोहळ्यात विशाल गोर्डे, अनुराग येवले, किरण गायकवाड, प्रशांत संत, सतीश निकम, संजय वक्ते, रवींद्र लचुरे, महेश मोरे आदी सपत्नीक पूजेसाठी बसले होते. या पर्जन्य महायज्ञाचे पौरोहित्य प्रमोद जोशी, वैभव जोशी, प्रदीप जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष डी.आर. काले, विजय आढाव, शिवसेनेचे नेते कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, माजी नगरसेवक जनार्दन कदम, गोपीनाथ गायकवाड, कैलास खैरे, दीपक जपे, वैभव गिरमे, रवींद्र रोहमारे, पिंटू नरोडे, किरण सुपेकर, सतीश रानोडे, चंद्रकांत वाघमारे, विजय चव्हाणके, किरण सूर्यवंशी, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, वासुदेव शिंदे, श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव समिती-२०२३ चे अध्यक्ष स्वप्नील मंजुळ, कार्याध्यक्ष आकाश वाजे, उपाध्यक्ष स्वराज सूर्यवंशी, समाधान कुऱ्हे, व्यवस्थाप्रमुख रवींद्र लचुरे, रुपेश सिनगर, सचिव नरेंद्र लकारे, अर्जुन मरसाळे, ओम बागुल, सहसचिव समीर खाटिक, दत्तात्रय कोळपकर, सदस्य इलियास शेख, अनिल जाधव, अजय गायकवाड, सिद्धार्थ पाटणकर, भैय्या नागरे, वैभव सोळसे, अभिजीत सूर्यवंशी, अमोल बागुल, समीर सुपेकर, मोनू म्हस्के तसेच आजी माजी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,नगरसेवक,विविध संस्थांचे संचालक,पदाधिकारी, नागरिक,कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदा कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानने हिंदू सण-उत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने अत्यंत साधेपणाने साजरा केला. यावेळी प.पू. रमेशगिरीजी महाराज, प.पू. राघवेश्वरानंदगिरीजी ऊर्फ उंडे महाराज, महामंडलेश्वर श्रीश्री १००८ प. पू. शारदानंदगिरी माताजी, प.पू. कैलासानंदगिरीजी महाराज, प.पू. गोवर्धनगिरीजी महाराज, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्कार रामदास गायकवाड या मुलाच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.