श्रीरामपुर( जनता आवाज वृत्तसेवा ): – मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठानच्या महिला समिती शाडूची गणेश मूर्ती बनविणे कार्यशाळा नुकतीच शिवबा हॉल या ठिकाणी संपन्न झाली. त्यासाठी लहान मुलांसह युवक, युवती व महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.
मराठा समाज प्रतिष्ठान महिला समितीच्या वतीने गेल्या चार वर्षापासून शाडूची गणपती मूर्ती बनवणे कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे. यावर्षीही आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद मिळाला याप्रसंगी अशोक शैक्षणिक संकुल च्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे या उपस्थित होत्या.प्रारंभी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष व महिला समितीच्या सौ. सीमाताई जाधव यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. या कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून श्री.शरद सोळस यांनी शाडू गणपती मूर्ती बनवण्याकरिता प्रात्यक्षिक करून दाखवले.त्यांना रमाकांत काळे यांनी सहकार्य केले.त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने गणपती मूर्ती बनवण्याची शिकवल्यामुळे लहान मुलांपासून वयस्कर असलेल्या महिलांनाही सुंदर व सुबक मूर्ती बनवणे शक्य झाले.
याप्रसंगी सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी मराठा प्रतिष्ठान महिला समिती विधायक व सामाजिक उपक्रम नेहमी राबवीत असल्याबद्दल कौतुक व्यक्त केले.यावेळी अध्यक्ष रमेश नवले, उपाध्यक्ष सीमा जाधव,विश्वस्त जयश्री नवले यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यशाळेसाठी सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना शाडूची माती विनामूल्य देण्यात आली.या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मराठा समाज महिला समितीच्या सौ.मयूरा निंबाळकर,सौ.छाया चोथे, लतिका गागरे यांनी परिश्रम घेतले.